फोटो सौजन्य - Social media
भारतीय कोस्ट गार्डमध्ये काम करू पाहणार्या उमेदवारांना आपल्या स्वप्नांची पूर्तता लकरता येणार आहे. जर तुम्ही या भरतीमध्ये सहभाग घेण्याची तयारी करत आहात, तर लवकरच तयारीला आणखीन वेग द्या. कारण या भरतीप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून अनेक पदांचा विचार केला जाणार आहे. ही पदे भारतीय कोस्ट गार्डच्या अंतर्गत आहेत. नियर सिव्हिलियन ऑफिसर (लॉजिस्ट), सिविलियन ऑफिसर (लॉजिक्स), असिस्टेंट डायरेक्टर (राजभाषा), सेक्शन ऑफिसर, सिव्हिलियन गजटेड ऑफिसर (लॉजिस्टिक्स), केर फोरमॅन आणि स्टोर कीपर- I या पदांसाठी जागा रिक्त असण्याचे सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा : कर्मचाऱ्यांकडून ओवर वर्क करण्यामध्ये भारतातील कंपन्यांचा दुसरा क्रमांक,’या’ देशांमध्ये दिले जाते वर्क लाईफ बॅलेन्सला महत्त्व
या भरती संबंधित अधिकृत अधिसूचना भारतीय कोस्ट गार्डने जाहीर केली आहे. या अधिसूचनेचा आढावा घेऊन उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे. भारतीय कोस्ट गार्डने जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भारतीय कोस्ट गार्डच्या indiancoastguard.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
भारतीय कोस्ट गार्डने आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये ३८ पदांचा विचार केला जाणार आहे. सीनियर सिव्हिलयन ऑफिसर (लॉजिस्टिक्स)ची ३ पदे, सिव्हिलियन ऑफिसर (लॉजिस्टिक्स)ची १२ पदे, असिस्टेंट डायरेक्टरची ३ पदे, सेक्शन ऑफिसरची 7 पदे, सिव्हिलियन गजटेड ऑफिसर (लॉजिस्टिक्स)ची ८ पदे, स्टोर के फोरमैनची 2 पदे तर स्टोअर कीपर ग्रेड- I च्या ३ पदांचा विचार या भरतीमध्ये केला जात आहे. एकंदरीत, या सर्व पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजिर्त करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये या भरतीमध्ये अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी काही अटीशर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी उमेदवारानं या अटी शर्ती पात्र असणे अनिवार्य आहे. अटी शर्ती पाहण्यासाठी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
हे देखील वाचा : SBI Asha Scholarship: विद्यार्थ्यांसाठी 7.5 लाख रुपयांपर्यंतची स्कॉलरशीप, 1 ऑक्टोबर 2024 अर्जाची शेवटची तारीख
विविध पदांसाठी विविध पगारव्यवस्था आहे. उमेदवारांना त्यांच्या पदानुसार तसेच अनुभवाच्या नुसार वेतन दिले जाईल. सीनियर सिव्हिलयन ऑफिसर (लॉजिक्स)च्या पदासाठी नियुक्त उमेदवाराला ७८,८०० रुपये ते २,०९,२०० रुपये वेतन दिले जाईल. सिव्हिलियन डॉलर ऑफिसर (लॉजिस्टिक्स)च्या पदासाठी नियुक्त उमेदवाराला ६७,७०० रुपये ते २,०८,७०० रुपये वेतन दिले जाईल. असिस्टेंट डायरेक्टरच्या पदासाठी नियुक्त उमेदवाराला ५६,१०० रुपये ते १,७७,५०० रुपये वेतन दिले जाईल. सेक्शन ऑफिसरच्या पदासाठी नियुक्त उमेदवाराला ९,३०० रुपये ते ३४,८०० रुपये वेतन दिले जाईल तर सिव्हिलियन गजटेड ऑफिसर (लॉजिस्टिक्स)च्या पदासाठी नियुक्त उमेदवाराला ४४,९०० रुपये ते १,४२,४०० रुपये वेतन दिले जाईल. सखोल महिरतीसाठी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.