Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एएम/एनएस इंडिया आणि बिट्स पिलानीच्या सहकार्याने पहिल्या एमबीए बॅचचा पदवीदान समारंभ; क्षमता विकासाला नवी दिशा

एएम/एनएस इंडिया आणि बिट्स पिलानी यांच्या संयुक्त पुढाकारातून मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटमधील एमबीए कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचचा पदवीदान समारंभ पार पडला आहे. या उपक्रमामुळे उद्योग क्षेत्रासाठी सक्षम नेतृत्व निर्माण करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 11, 2026 | 07:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

पोलाद क्षेत्रातील आघाडीची कंपनी एएम/एनएस इंडिया आणि बिट्स पिलानी यांच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात आलेल्या मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटमधील एमबीए कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचचा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या उपक्रमामुळे उद्योग क्षेत्रासाठी सक्षम नेतृत्व निर्माण करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली असून क्षमता विकासाच्या दिशेने कंपनीने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

जगातील आघाडीच्या दोन पोलाद उत्पादक कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एएम/एनएस इंडियाने कौशल्य विकास आणि सातत्यपूर्ण शिक्षणाला प्राधान्य देत बिट्स पिलानीसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. यापूर्वी प्रोसेस इंजिनिअरिंगमधील बी.टेक. कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवल्यानंतर कंपनीने आता मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटमधील एमबीए कार्यक्रमाद्वारे कर्मचाऱ्यांच्या नेतृत्व क्षमतांना अधिक बळकटी दिली आहे. हा दीक्षांत समारंभ एएम/एनएस इंडियाच्या गुजरातमधील हजीरा प्रकल्पात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुरतचे पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी अनुपम सिंह गहलोत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पदवीधरांचे अभिनंदन करत व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबत उच्च शिक्षण पूर्ण करणे हे शिस्त, मेहनत आणि दृढनिश्चयाचे उदाहरण असल्याचे सांगितले.

एएम/एनएस इंडियाने वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम्स (WILP) च्या माध्यमातून उद्योग आणि शिक्षण यांचा प्रभावी संगम घडवून आणला आहे. कंपनीतील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना नोकरी करतानाच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शैक्षणिक ज्ञानाचा थेट कामकाजात उपयोग करता आला आणि व्यावसायिक कौशल्यांमध्येही वाढ झाली. मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटमधील हा एमबीए कार्यक्रम पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा वेगळा असून आधुनिक पोलाद उद्योगातील आव्हाने लक्षात घेऊन तयार करण्यात आला होता. पुरवठा साखळी व्यवस्थापन, धोरणात्मक वित्त, संस्थात्मक नेतृत्व, डिजिटल परिवर्तन, शाश्वत उत्पादन पद्धती आणि माहिती-आधारित निर्णयप्रक्रिया यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा त्यात समावेश करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या लवचिक आणि बहुआयामी अध्यापन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांसोबत शिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण केले. यामुळे संस्थेमध्ये सातत्यपूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि उत्कृष्ट कामगिरीची संस्कृती अधिक मजबूत झाली आहे. या पहिल्या पदवीधर बॅचमधील कर्मचाऱ्यांनी विविध विभागांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कॅपस्टोन प्रकल्पांमधून उत्पादन प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी उपाय सुचविण्यात आले, कार्यक्षमतेत वाढ करण्यात मदत झाली आणि व्यवसाय प्रक्रियांमध्ये सुधारणा घडवून आणण्यात यश मिळाले. त्यामुळे कंपनीच्या विविध विभागांमध्ये परिणामकारकता वाढल्याचे दिसून आले आहे.

रस्ते अपघातांना बसणार ब्रेक! हायवे सुरक्षेसाठी भारताचा मास्टरस्ट्रोक, ‘असा’ होणार AI तंत्रज्ञानाचा वापर

एएम/एनएस इंडियाचे संचालक आणि उपाध्यक्ष (मानव संसाधन व प्रशासन) आशुतोष तेलंग यांनी सांगितले की, सातत्यपूर्ण शिक्षण हा कंपनीच्या क्षमता विकास धोरणाचा केंद्रबिंदू आहे. बिट्स पिलानीसोबतच्या सहकार्यामुळे भविष्यासाठी सज्ज नेतृत्व तयार होत असून नवकल्पना आणि उत्कृष्टतेला चालना मिळत आहे. बिट्स पिलानीचे उपसंचालक प्रा. एस. गुरुनारायणन यांनीही या भागीदारीचे कौतुक करत उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, आजच्या औद्योगिक वातावरणात नेतृत्वासाठी व्यवस्थापन कौशल्यांसोबत तांत्रिक आणि शाश्वत विकासाची समज असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एएम/एनएस इंडिया आणि बिट्स पिलानी यांचा हा उपक्रम उद्योग क्षेत्रासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि भविष्यासाठी सज्ज नेतृत्व निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

Web Title: Convocation ceremony of the first mba batch in collaboration with amns india and bits pilani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Bachelors Degree job
  • MBA

संबंधित बातम्या

Top 5 Management Colleges: एमबीए करायचंय? प्रवेश घेण्यापूर्वी जाणून घ्या देशातील टॉप ५ मॅनेजमेंट कॉलेजेसची यादी!
1

Top 5 Management Colleges: एमबीए करायचंय? प्रवेश घेण्यापूर्वी जाणून घ्या देशातील टॉप ५ मॅनेजमेंट कॉलेजेसची यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.