फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्ही सरकारी नोकरी करू पाहत आहात तर OFBL ची संधी सोडू नका. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की आज या भरतीसाठी शेवटची तारीख आहे. यानंतर अर्ज करता येणार नाही. ऑर्डिनन्स फॅक्टरी बडमाल (Ordnance Factory Badmal – OFBL) तर्फे अप्रेंटिसच्या 42 पदांसाठी भरती जाहीर झाली होती. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 8 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अधिकृत संकेतस्थळ munitionsindia.in वर जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे.
उपलब्ध पदांचा तपशील पाहिलात तर टेक्निशियन अप्रेंटिस (TA) पदांसाठी 12 जागा रिक्त आहेत. नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस (GA) पदांसाठी 18 जागा रिक्त आहेत. उमेदवारांना स्टायपेंड पुरवण्यात येणार आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस (GA) पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ₹9,000 प्रतिमहिना स्टायपेंड देण्यात येणार आहे. टेक्निशियन अप्रेंटिस (TA) पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ₹8,000 प्रतिमहिना स्टायपेंड देण्यात येणार आहे. नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ₹9,000 प्रतिमहिना देण्यात येणार आहे.
उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेतून इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीतील पदवी, किंवा B.A., B.Sc., B.Com. पदवी, अथवा संबंधित विषयातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया
पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करून ही सुवर्णसंधी नक्की साधावी.