फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली पोलिस काॅन्स्टेबल पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)ने भरतीचे आयोजन केले आहे. या भरतीच्या माध्यमातून 7,565 पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर [ssc.gov.in](https://ssc.gov.in) जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत मिळेल. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्या सुधारता येतील.
कॉम्प्युटर-आधारित परीक्षा डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. अर्ज कर्त्या उमेदवारांना या परीक्षेसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सर्वसाधारण उमेदवारांसाठी शुल्क ₹100 निश्चित करण्यात आले आहे. हे अर्ज शुल्क 22 ऑक्टोबरपर्यंत भरता येईल. तसेच महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) उमेदवारांना शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.
उमेदवारांना काही निकष निश्चित करण्यात आले आहे. या निकषांनुसार, 1 जुलै 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. मात्र, दिल्ली पोलिस कर्मचारी/मल्टी-टास्किंग स्टाफ यांची मुले तसेच बँडसमन, बुगलर, माऊंटेड कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर या पदांसाठी 11 वी उत्तीर्ण असलेले उमेदवारही पात्र ठरतील. पुरुष उमेदवारांकडे दोन/चार चाकी हलक्या वाहनाचे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
वेतनश्रेणी
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती Pay Level-3 (₹21,700 – ₹69,100) या पगारश्रेणीत केली जाईल. ही गट-‘C’ पदे आहेत.