फोटो सौजन्य - Social Media
सणासुदीच्या सुरुवातीसोबतच भारतातील बँकिंग, फायनान्स सेवा, आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्र ग्राहकांच्या वाढत्या व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी तयारीत आहे. ग्राहकांची खरेदी आणि देवाण घेवाणाची मागणी वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील आर्थिक संस्था सणासुदीच्या काळात डिजिटल बँकिंग संचालन वाढवू इच्छुक आहेत. उत्कृष्ट ग्राहकसेवा देणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. यासाठी ते कुशल मनुष्यबळ तयार करत आहेत. टीमलीझ सर्व्हिसेस सांगते कि,” या कालावधीत रोजगाराची वाढ मोठ्या प्रमाणात होणार आहे. विशेषतः रिटेल लेंडिंगमध्ये ही वाढ दिसून येणार आहे. तर मायक्रोफायनान्स संस्था (MFI) आणि पेमेंट सेवांमध्येदेखील रोजगार संधींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.” असेही सांगण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना उत्तम सेवाही मिळणार आहे आणि यात ग्राहकांचा अधिक फायदा आहे हे मात्र नक्की.
हे देखील वाचा : AIIMS मध्ये भरतीला सुरुवात; नागपूर संस्थानात ६२ पदांसाठी व्हॅकन्सी, गोरखपूरमध्ये १४४ पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती
गणेश चतुर्थीपासून दिवाळीपर्यंत खरेदी
सणासुदीचे दिवस उत्साह जरी घेऊन येतो, तितकाच खर्चही करवतो. गेल्या काही दिवसांमध्ये या खर्चाचे प्रमाण वाढले आहे. गणेश चतुर्थी, नवरात्री, दसरा आणि आता दिवाळी या दिवसांमध्ये खरेदीचे प्रमाण फार असते. दरम्यान या महिन्यांमध्ये वाहन कर्जे आणि वैयक्तिक कर्जांची मागणी १२% वाढली आहे, ज्याचे प्रमुख कारण गणेश चतुर्थीपासून सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या सणासुदीची खरेदी आहे. याचा थेट परिणाम रिटेल लेंडिंग आणि एमएफआय क्षेत्रातील रोजगार संधींवर होईल. टीमलीझच्या अहवालानुसार, जुलै ते नोव्हेंबर दरम्यान बीएफएसआय क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण १२,००० वरून १९,००० पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, तर एमएफआय सेवांची मागणी २५% वाढेल, ज्यामुळे आर्थिक समावेशनाच्या दिशेने या क्षेत्राचा अधिक भर दिसून येतो.
सणासुदीच्या काळात नक्की कशी परिस्थिती
सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर ग्राहक क्रेडिट कार्डच्या वापराकडे वळले आहेत. परिणामी, नोकऱ्या आणि रोजगाराच्या सांध्यांच्या वाढीला चालना मिळाली आहे. महत्वाची बाब अशी आहे कि पेमेंट सर्व्हिसेसमधील नोकऱ्या ४१% वाढणार आहे. तर, क्रेडिट कार्ड सेगमेंटमध्ये रोजगार संधी ३२% वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आर्थिक संस्था फक्त मनुष्यबळ वाढवून थांबत नाहीत, तर विद्यमान कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात वाढ करत आहेत.
हे देखील वाचा : RBI तर्फे आयोजित स्पर्ध्येत राज्यातील ‘या’ शैक्षणिक संस्थ्येने पटकावला तृतीय क्रमांक
कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढविण्यावर अधिक भर
टीमलीझचे उपाध्यक्ष कृष्णेंदू चटर्जी म्हणतात, “या सणासुदीच्या काळात बँकिंग, फायनान्स सेवा, आणि विमा (BFSI) क्षेत्रात कुशल कर्मचाऱ्यांची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कंपन्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कंपन्या मनुष्यबळ वाढवण्यावर लक्ष देत आहेत, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यावर भर देत आहेत.