फोटो सौजन्य - Social Media
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) मध्ये रोजगाराची संधी शोधत आहात. तर ही भरती खास तुमच्यासाठी आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या भरतीच्या माध्यमातून होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती नागपूर अथवा गोरखपूरमध्ये केली जाईल. AIIMS नागपूरमध्ये ६२ रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. AIIMS गोरखपूरमध्ये १४४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे. दोन्ही शहरांकडील उमेदवारांना AIIMS मध्ये काम करण्याची इच्छा असेल तर ते या भरतीचा लाभ घेऊ शकतात. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
हे देखील वाचा : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये १५०० पदांसाठी बंपर भरती; आजपासून करता येईल अर्ज
AIIMS ने नागपूर तसेच गोरखपूर येथे भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. AIIMS नागपूरमध्ये एकूण ६२ उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीमध्ये विचारात घेतलेल्या ६२ जागांपैकी १२ रिक्त जागा प्रोफेसर पदासाठी आहेत. १२ जागा ऍडिशनल प्रोफेसर पदासाठी आहेत. असोसिएट प्रोफेसर पदासाठी एकूण १८ जागा रिक्त आहेत. असिस्टंट प्रोफेसरच्या २० रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या पदासांठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय ५८ वर्षे असणे आवशयक आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल. तसेच उमेदवाराला AIIMS नागपूरच्या या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी शैक्षणिक अटीला पात्र करणे आवश्यक आहे. उमेदवार संबंधित विषयामध्ये पदवीधर किंवा उच्च पदवीधर हवा. नियुक्त उमेदवाराला त्याच्या अनुभवानुसार वेतन देण्यात येईल. एकंदरीत, निवड झालेल्या उमेदवाराला १,३८,००० लाख रुपयांपासून ते २,२०,४०० रुपये इतके दरमाह वेतन देण्यात येईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. General/OBC/EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २००० रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. तर SC/ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी ही रक्कम ५०० निश्चित करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : NSCLने आयोजित केली भरती प्रक्रिया; १८८ रिक्त पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती
AIIMS गोरखपूरमध्ये एकूण १४४ पदांसाठी ही भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. येथे आरक्षित प्रवर्गासाठी पदे आरक्षित आहेत. १४४ पदांपैकी, ३९ रिक्त पदांसाठी सामान्य क्ष्रेणीतील उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. २० रिक्त पदांसाठी EWS प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. ४५ रिक्त पदे OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. तर २६ पदे SC प्रवर्गासाठी राखीव आहेत आणि उर्वरित १४ पदांसाठी SC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या भरतीमध्ये जास्तीत जास्त ४५ वर्षे आयु असलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात. अर्ज करताना General/OBC/EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १,१८० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC, ST तसेच PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.