Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करा! सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन

वाशिम येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 21, 2026 | 06:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

वाशिम येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना सामाजिक व समकालीन विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा विशेष उल्लेख करत स्वच्छता, प्रबोधन आणि समाजजागृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ‘अंधश्रद्धा निर्मूलनात गाडगेबाबांचे योगदान’ या विषयावर बोलताना प्रा. डी. एस. कव्हर यांनी तरुणांनी गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करून समाजपरिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. गाडगेबाबांनी आपल्या कार्यातून स्वच्छता, साधेपणा आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढा यांना विशेष महत्त्व दिले होते. त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

परीक्षेदरम्यान तणावाचे वातावरण! आढळली कॉपी तर अनेक विद्यार्थ्यांसाठी जागेचा अभाव

प्रा. महेश देवळे व प्रा. डी. एन. मगर यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवावा, असे सांगितले. सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शनकार्यक्रमाचे आयोजन सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरात महिला सक्षमीकरण, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, मासिक पाळी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचे संचालन चैतन्य इंगोले व स्नेहा खरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन टेकाळे, तेजस हिवराळे आणि नितेश हनवते यांनी केले.

महिला सक्षमीकरण विषयावर बोलताना स्वप्निल चव्हाण यांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी देणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अॅड. राधा नरवलिया यांनी मुलींच्या घटत्या जन्मदराकडे लक्ष वेधत स्त्री भ्रूणहत्येसारख्या गंभीर समस्यांवर समाजाने सजग होण्याचे आवाहन केले.

Maharashtra Board HSC Exam : कुठे आहे पारदर्शकता? राज्यात सामूहिक कॉपी; ३१ कर्मचाऱ्यांना केले फायर

मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता याकडे विशेष लक्ष दिल्यासच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक मूल्यांचीही जाणीव झाली असून, समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले.

Web Title: Follow gadge babas ten precepts washim news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 06:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.