फोटो सौजन्य- iStock
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (CDS) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण दिले जाते. नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतीसाठी २० जानेवारी २०२५ ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत सी.डी.एस.(CDS) प्रशिक्षणाचे क्र. ६४ आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात निशुल्क प्रशिक्षणासह, निवास व भोजन उपलब्ध असेल अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे ६ जानेवारी २०२५ रोजी मुलाखतीस सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हजर रहावे. Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवरील सी.डी.एस.-६४ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट संपूर्ण माहितीसह आणावी.
सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे.
उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी. डी. एस. (CDS) या परीक्षेकरिता ऑनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअॅप क्र. 9156073306 (प्रवेश मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.
CDS 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 11 डिसेंबर 2024 रोजी CDS 2025 अधिसूचना जारी केली. CDS 1 2025 अर्जाचा फॉर्म देखील 11 डिसेंबर 2024 रोजी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला. इच्छुक उमेदवार 31 डिसेंबर 2024 (PM 6) पर्यंत CDS 1 अर्ज 2025 भरू शकतात. CDS 1 2025 साठी अधिसूचना PDF स्वरूपात प्रकाशित करण्यात आली होती आणि CDS परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या तपशीलांचा समावेश आहे. CDS 1 अधिसूचना 2025 डाउनलोड करण्यासाठी येथे थेट लिंक प्रदान केली आहे. CDS 1 2025 ची परीक्षा 13 एप्रिल 2025 रोजी घेतली जाईल. प्राधिकरणाने CDS 1 2025 रिक्त पदांची अंदाजे संख्या 457 जारी केली जी संस्थेद्वारे भरती प्रक्रियेद्वारे भरली जाईल.
दुसरीकडे, CDS 2 2025 अधिसूचना 28 मे 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. CDS 2 अर्ज 2025 मे 28 ते 17 जून 2025 या कालावधीत उपलब्ध असेल. CDS 2 2025 ची परीक्षा 14 सप्टेंबर 2025 रोजी घेतली जाईल. परीक्षेच्या पद्धतीनुसार, IMA, INA आणि AFA साठी एकूण 300 गुण आहेत आणि त्यासाठी OTA 200. CDS अभ्यासक्रम, तारखा, पात्रता, रिक्त जागा, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया आणि बरेच काही यासह CDS परीक्षेबद्दल अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये वाचता येईल.