Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी या निर्णयाची घोषणा केली. ते म्हणाले, दोन लाख रुपयांपर्यंतच्या सर्व शेती व पीक कर्ज व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क १ जानेवारी २०२६ पासून पूर्णतः माफ करण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 04, 2026 | 11:30 AM
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील महायुती सरकारकडून सर्वसामान्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने बँकेकडून पीक कर्ज घेताना लागणारे तारण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. त्याचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे यासंबंधीचे अधिकृत राजपत्रही जारी झाले आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी या निर्णयाची घोषणा केली. ते म्हणाले, दोन लाख रुपयांपर्यंतच्या सर्व शेती व पीक कर्ज व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क १ जानेवारी २०२६ पासून पूर्णतः माफ करण्यात येणार आहे. या निर्णयाबाबतचा अधिकृत आदेश महसूल व वन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. शेती हा अत्यंत जोखमीचा व्यवसाय आहे. वातावरणात होणाऱ्या सतत बदलांचा शेतीवर थेट परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत पीक कर्ज हेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. पण कर्ज घेताना होणारा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत होता. हे लक्षात घेऊन सरकारने मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ च्या कलम ९ च्या खंड (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून लोकहितास्तव पुढील कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे खात्री पट असल्याचे हा निर्णय घेण्यात आला.

कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले समाधान

दुसरीकडे, कृषी तज्ज्ञांनी सरकारच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, औषधी, यंत्रसामग्री आदींसाठी शेतकऱ्यांना अधिक भांडवलाची गरज असते. मुद्रांक शुल्क माफ झाल्याने कर्जाचा संपूर्ण फायदा प्रत्यक्ष शेतीकामासाठी वापरता येणार आहे, असे ते म्हणाले.

प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावे लागणारे मुद्रांक शुल्कही माफ

विशेष म्हणजे राज्य सरकारने यापूर्वी देखील सर्वच प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांनाही फायदा झाला होता.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चांवर बावनकुळेंचे मोठं विधान; म्हणाले, ‘भाजप हायकमांड निर्णय…’

Web Title: State government has provided major relief to farmers stamp duty waived on crop loans up to two lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Maharashtra Government
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य सरकारचे मिशन; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
1

क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य सरकारचे मिशन; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’
2

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’

Maharashtra Politics: जयंत पाटलांना अर्थखाते मिळणार? राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांसोबत गुप्त बैठकांचे सत्र सुरूच
3

Maharashtra Politics: जयंत पाटलांना अर्थखाते मिळणार? राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांसोबत गुप्त बैठकांचे सत्र सुरूच

Maharashtra Breaking News Updates Today: ना कोणताही आवाज, ना धूर; देशात पहिल्यांदाच धावणार हायड्रोजन ट्रेन
4

Maharashtra Breaking News Updates Today: ना कोणताही आवाज, ना धूर; देशात पहिल्यांदाच धावणार हायड्रोजन ट्रेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.