Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नौदलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12 वी पास उमेदवार करु शकतात अर्ज, पगार 69 हजार रुपयांपर्यंत

भारतीय नौदलाने  SSR वैद्यकीय सहाय्यक पदाची भरती जाहीर केली आहे. या भरतीप्रक्रियेमध्ये 12 वी उतीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. या निवड झालेल्या उमेदवारास 69 हजार रुपयांपर्यंत वेतन असणार आहे. तसेच विविध सुविधाही मिळणार आहेत. 17 सप्टेंबरपर्यंत या भरतीप्रक्रिये करिता अर्ज करु शकता. जाणून घ्या त्याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Sep 02, 2024 | 09:29 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय सैन्यदलात नोकरी  म्हणजे आपल्याला देशसेवा करण्याची थेट संधी असते. त्यामुळे सैन्यदलात सामील होण्यासाठी अनेक जण तयारी करत असतात. लाखो उमेदवार यासाठी परीक्षा देतात मात्र केवळ काही जणांना भारताच्या सैन्यदलात देशसेवा करण्याची संधी मिळते. मात्र  अनेक जण एका परीक्षेत उतीर्ण न झाल्यास अधिक मेहनत करुन उर्तीर्ण होण्याची कामगिरी करतातच. ज्यांना देशसेवा करायची आहे त्यांसाठी नौदलाने नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. जाणून घेऊया याबद्दल

भारतीय नौदलाने  SSR वैद्यकीय सहाय्यक पदाची भरती जाहीर केली आहे. यासाठी शनिवार ७ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू होणार आहेत. या भरतीप्रक्रियेमध्ये 12वी पास अविवाहित युवक या फॉर्म भरू शकतात. या भरतीप्रक्रियेत सहभागी होण्याकरिता नौदलाच्या https://www.joinindiannavy.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.  17 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची  तारीख आहे.  भरतीप्रक्रियेच्या जाहिरातीची लिंक खाली दिली गेली आहे.

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता

नौदलातील या भरतीसाठी उमेदवार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह 12वी उत्तीर्ण असावा. एकूण ५० टक्के गुण आणि प्रत्येक विषयात ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा- टिए आर्मीमध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

वयोमर्यादा

या भरतीप्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराचा जन्म 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान झाला असावा.

SSR वैद्यकीय सहाय्यक भरतीसाठी शारीरिक निकष

किमान उंची- 157 सेमी
छाती- किमान 5 सेमी विस्तारली पाहिजे

शारीरिक फिटनेस चाचणी

  • उमेदवाराला 6 मिनिटे 30 सेकंदात 1.6 किमी धावावे लागेल.
  • उमेदवाराला 20 सिट-अप करावे लागतील.
  • इच्छुक उमेदवाराला 15 पुशअप करावे लागतील.
  • उमेदवारास  15 वाकलेले गुडघा सिटअप करावे लागतील.
निवड प्रक्रिया

सर्व प्रथम 12वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर त्यांची लेखी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी होईल.

SSR वैद्यकीय सहाय्यकाचे वेतन आणि भत्ते

  • नौदलातील SSR वैद्यकीय सहाय्यकाला प्रशिक्षणादरम्यान दरमहा 14600 रुपये आणि त्यानंतर संरक्षण वेतन मॅट्रिक्स स्तर-3 नुसार 21700-69100 रुपये वेतन मिळणार आहे.
  • याशिवाय उमेदवाराला लष्करी सेवा वेतन आणि 5200 रुपये प्रति महिना डीए देखील दिला जाईल.
  • SSR वैद्यकीय सहाय्यकास मास्टर चीफ पेटी ऑफिसर-I या पदापर्यंत पदोन्नती मिळेल.
  • वैदकीय सहाय्यकास प्रशिक्षणादरम्यान आणि नंतर, खलाशांना पुस्तके, वाचन साहित्य, गणवेश, भोजन आणि राहण्याचे निवासस्थान देखील मिळते.
भरतीप्रक्रियेच्या जाहिरातीमध्ये भरतीप्रक्रियेची सविस्तर माहिती दिली गेली आहे.

 भरतीप्रक्रियेच्या जाहिरातीसाठी इथे क्लिक करा.  

Web Title: Golden job opportunity in navy 12th pass candidates can apply salary upto 69 thousand rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 09:27 PM

Topics:  

  • Government Job

संबंधित बातम्या

आता थांबायच नाय! Railway Jobs करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 312 पदांसाठी भरती सुरु
1

आता थांबायच नाय! Railway Jobs करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 312 पदांसाठी भरती सुरु

Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी! ‘या’ तीन राज्यांमध्ये नोकरीसाठी जागा रिक्त, आजच करा अर्ज
2

Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी! ‘या’ तीन राज्यांमध्ये नोकरीसाठी जागा रिक्त, आजच करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.