Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता थांबायच नाय! Railway Jobs करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 312 पदांसाठी भरती सुरु

जर तुम्हीही भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे. याचे कारण म्हणजे रेल्वे भरती मंडळाने 312 आयसोलेटेड श्रेणीतील पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 09, 2026 | 06:47 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • रेल्वे भरती मंडळाकडून भरतीची घोषणा
  • 312 आयसोलेटेड श्रेणीतील पदांसाठी अर्ज
  • मिळणार दमदार पगार
Government Job ची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी रेल्वेकडून एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत एकूण 312 रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीमध्ये ज्युनिअर ट्रान्सलेटर, चीफ लॉ असिस्टंट, स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टर यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.

पदांचा तपशील

RRB कडून आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत एकूण 312 पदांवर भरती केली जाणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर – 202 पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु केली जाणार आहे. तसेच चीफ लॉ असिस्टंटसाठी 22 पदे, पब्लिक प्रॉसिक्युशनसाठी 7 पदे, सीनियर पब्लिक इन्स्पेक्टरसाठी 15 पदे, स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टरसाठी 24 पदे. तसेच तांत्रिक व वैज्ञानिक श्रेणीत सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंगसाठी 2 पदे, लॅब असिस्टंट ग्रेड-3 (केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट) साठी 39 पदे, सायंटिफिक सुपरवायझरसाठी 1 पद,
अशी पदे भरली जाणार आहेत.

Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी! ‘या’ तीन राज्यांमध्ये नोकरीसाठी जागा रिक्त, आजच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता

या भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

  • ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी संबंधित विषयात पदवी आवश्यक आहे.
  • चीफ लॉ असिस्टंट आणि पब्लिक प्रॉसिक्युशन पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी (Law Degree) आवश्यक आहे.
  • सायंटिफिक असिस्टंट, लॅब असिस्टंट आणि इतर तांत्रिक पदांसाठी विज्ञान शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. कमाल वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असून साधारणतः 30 ते 40 वर्षांदरम्यान आहे. SC, ST, OBC आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

पगार किती मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार आकर्षक वेतन दिले जाईल. बहुतांश पदांसाठी 35,400 प्रति महिना वेतन मिळेल. चीफ लॉ असिस्टंट सारख्या वरिष्ठ पदांसाठी 44,900 प्रति महिना पर्यंत वेतन दिले जाईल. याशिवाय महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) आणि केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर सुविधा मिळणार असल्याने एकूण मासिक उत्पन्न अधिक वाढेल.

Chhatrapati Sambhajinagar : अभ्यासाबरोबरचं स्वसंरक्षण काळाची गरज; विद्यार्थांना करुन दिली शस्त्रांची ओळख

अर्ज शुल्क

  • जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी – ₹500
  • SC आणि ST उमेदवारांसाठी – ₹250
हे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन भरता येईल. रेल्वेकडून शुल्कात सवलतही देण्यात येणार असून CBT-1 परीक्षा दिल्यानंतर जनरल, OBC, EWS उमेदवारांना ₹400 रिफंड केले जाईल. तसेच, SC/ST उमेदवारांना पूर्ण ₹250 रिफंड दिला जाईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • उमेदवारांनी सर्वप्रथम rrbapply.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • “Create an Account” वर क्लिक करून नोंदणी करावी.
  • लॉगिन करून अर्जामधील आवश्यक माहिती भरावी.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा.
  • शेवटी अर्जाचा प्रिंटआउट काढून ठेवावा.
 

Web Title: Railway recruitment board rrb announced recruitment notification for total of 312 vacancies under isolated category

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • Government Job
  • Railway Job

संबंधित बातम्या

Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी! ‘या’ तीन राज्यांमध्ये नोकरीसाठी जागा रिक्त, आजच करा अर्ज
1

Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी! ‘या’ तीन राज्यांमध्ये नोकरीसाठी जागा रिक्त, आजच करा अर्ज

आदिवासी विभागात शिक्षकांची 1 हजार पदे रिक्त, कंत्राटी भरतीद्वारे तात्पुरती मलमपट्टी
2

आदिवासी विभागात शिक्षकांची 1 हजार पदे रिक्त, कंत्राटी भरतीद्वारे तात्पुरती मलमपट्टी

विद्यापीठात CORS स्टेशन उभारणार, GPS आधारित सर्वेक्षणात अचूकतेचा नवा टप्पा
3

विद्यापीठात CORS स्टेशन उभारणार, GPS आधारित सर्वेक्षणात अचूकतेचा नवा टप्पा

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज
4

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.