Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! JEE-NEET साठी मोफत प्रशिक्षण

मातंग समाजातील 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी JEE-NEET साठी दोन वर्षांचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार. ऑनलाईन अर्ज 1 ते 30 जुलै 2025 दरम्यान स्वीकारले जातील.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 28, 2025 | 07:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम समाजातील विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे यांच्या वतीने एक अत्यंत उपयुक्त व सशक्त उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये JEE (Joint Entrance Examination) आणि NEET (National Eligibility cum Entrance Test) या स्पर्धा परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांना निःशुल्क, अनिवासी, ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पोलादपूर तालुक्यात शालेय साहित्य वाटप; कृष्णा कदम यांचे हॉस्पिटल स्थापनेचे स्वप्न

या उपक्रमांतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर या प्रमुख ठिकाणी खासगी व नामांकित संस्थांमार्फत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाची कालावधी दोन वर्षांची (मे 2025 ते मे 2027) असणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सन 2025 मध्ये इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पात्रता व निवड प्रक्रिया:

उमेदवार मातंग समाज किंवा तत्सम 12 पोटजातीतील असावा आणि त्याचे कुटुंबीय उत्पन्न वार्षिक 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. उमेदवारांची निवड ही इयत्ता 10 वीच्या गुणांच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण व अभ्याससामग्री मोफत पुरवली जाईल. हा उपक्रम विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी एक ठोस आधार देणारा ठरणार आहे.

नोंदणी प्रक्रिया:

पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी 1 जुलै 2025 ते 30 जुलै 2025 या कालावधीत https://cpetp.barti.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने करावी. नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे आणि वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरावी.

१०वी नंतर पॉलिटेक्निक कोणत्या शाखेत घ्यावी? जाणून घ्या २०२५ मध्ये सर्वात मागणी असलेले कोर्सेस 

या उपक्रमामधून समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन BARTIचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे. ही योजना म्हणजे गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.

Web Title: Golden opportunity for students from matang community free coaching for jee neet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 07:12 PM

Topics:  

  • JEE exam
  • NEET
  • NEET Exam

संबंधित बातम्या

NEET PG 2025 Result: या आठवड्यात लागणार नीट पीजी निकाल, कुठे पाहता येणार?
1

NEET PG 2025 Result: या आठवड्यात लागणार नीट पीजी निकाल, कुठे पाहता येणार?

हजारो तरुणांना प्रेरणा देणारी प्रेरणा! वडील नाहीत, आई रिक्षाचालक… अशा प्रकारे क्रॅक केली NEET
2

हजारो तरुणांना प्रेरणा देणारी प्रेरणा! वडील नाहीत, आई रिक्षाचालक… अशा प्रकारे क्रॅक केली NEET

मायलेकीने सोबत क्रॅक केली NEET परीक्षा… वयाच्या पन्नाशीत जॉईन करणार मेडिकल कॉलेज
3

मायलेकीने सोबत क्रॅक केली NEET परीक्षा… वयाच्या पन्नाशीत जॉईन करणार मेडिकल कॉलेज

NEET UG 2025 Counselling: NMC ने देशभरात संस्थांचे सीट मॅट्रिक्स जाहीर, कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा रिक्त
4

NEET UG 2025 Counselling: NMC ने देशभरात संस्थांचे सीट मॅट्रिक्स जाहीर, कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा रिक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.