फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन स्वरूपात करायचे आहे. अप्रेंटिसशिप या रिक्त पदांना भरण्यासाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण ५४ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. nhpcindia.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. २४ डिसेंबर २०२४ रोजी ही भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. १० जानेवारी २०२५ या तारखेपर्यंत उमेदवारांना या भर्तीसाठी अर्ज करता येणार आहे. संध्याकाळी ५ वार्जेपर्यंत अर्ज करण्याची विंडो खुली असणार आहे.
अप्रेन्टिसशिप पदासाठी एकूण ५४ जागा रिक्त आहेत. तसेच या पदासाठी अर्ज करता उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती उमेदवाराच्या शिक्षणासंदर्भात आहेत. तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात काही अटी शर्ती उमेदवारांना पात्र करावे लागणार आहेत. एकंदरीत, या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार संबंधित क्षेत्रामध्ये ITI उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच संबंधित क्षेत्रात डिप्लोमाधारक उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
इलेक्ट्रिशिअन, फिटर, वेल्डर, मॅकेनिक, इलेक्ट्रिकल तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर या पदांना भरण्यासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. अर्ज करता उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून ITI उत्तीर्ण केलेले असावे किंवा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उमेदवाराने डिप्लोमा प्राप्त केले असावे. तसेच या भरतीसाठी किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. तसेच कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच सरकारी नियमानुसार, उमेदवारांना आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तसेच नियुक्त उमेदवाराला स्टायपेंड देण्यात येईल.
नियुक्तीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारांची सदर पदांसाठी नियुक्ती केली जाईल. यामध्ये उमेदवारांना मेरिट लिस्टच्या माध्यमातून नियुक्त केले जाईल. ITI तसेच डिप्लोमामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. तसेच दस्तऐवजांची पडताळणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज :