फोटो सौजन्य - Social Media
सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, सांताक्रुज (पूर्व), मुंबई येथे अतिरिक्त सहाय्यक अधिधिका पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी १५ जानेवारी, २०२५ रोजीपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रा. प्र. जाधव यांनी केले आहे. या पदसंबंधित जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरती बाबत अधिक आणि सखोल माहिती जाणून घेण्यासाठी या जाहिरातीचा आढावा घेण्यात यावा.
इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. या पात्रता निकषांना पात्र करणाऱ्या उमेदवारालाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार सैनिक सेवेत बलिदान देणाऱ्या सैनिकांची पत्नी असावी. किंवा युद्ध विधवा असावी. तसेच माजी सैनिक आणि आजी सैनिकांना या भरतीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदाराने एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे आणि टायपिंगचे कौशल्य असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
अर्ज कर्त्या उमेदवाराला वयोमायदे संबंधित पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. मुळात, वयोमर्यादा ४५ वर्षांच्या आत असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ₹२४,४७७ मानधन दिले जाईल. ही एक उत्तम संधी असून पात्रता निकषात पात्र उमेदवारांने नक्कीच या संधीचा फायदा घेण्यात यावा. अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्रांची पुष्टता करणे अनिवार्य आहे. उमेदवाराने अर्जासोबत युद्ध विधवा, विधवा, किंवा माजी/आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र, तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास किंवा कागदपत्रांची पूर्तता नसल्यास अर्ज वैध मानला जाणार नाही.
निवड प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रकारचे अंतिम बदल करण्याचा अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे राखीव ठेवण्यात आला आहे. निवड प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतात, त्यामुळे अर्जदारांनी प्रक्रिया पूर्णतः समजून घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये काही शंका अथवा माहितीची आवश्यकता असल्यास, संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात येते. अर्जाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर येथे थेट भेट देणे किंवा संपर्क साधणे सोयीचे ठरेल. कार्यालयाचा पत्ता आहे: सैनिकी मुलींचे वसतिगृह, कलिना, डायमंड आवा हॉस्टेलच्या मागे, हंस भुंग्रा मार्ग, सांताक्रूज (पूर्व), मुंबई – ४०००५५.
दूरध्वनी क्रमांक ०२२-३५०८३७१७ वर देखील संपर्क साधता येईल. कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळा आणि इतर माहिती तपासून योग्य वेळी भेट देणे किंवा कॉल करणे अधिक सोयीचे ठरेल. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज प्रक्रियेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे. यामुळे अर्जदारांना प्रक्रियेतील संभाव्य बदलांबाबत योग्य माहिती मिळण्यास मदत होईल आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळता येईल.