कोणत्या देशात झाडं लावल्यावर मिळतेय डिग्री (फोटो सौजन्य - iStock)
Graduation ची पदवी मिळविण्यासाठी लोक खूप काही करतात. पण जर तुम्हाला १० झाडे लावायला सांगितले आणि झाडं लावल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनची डिग्री मिळेल असं सांगितलं तर? मग तुम्ही काय म्हणाल? झाडांची कमी होत चाललेली संख्या पाहता, एका देशात एक अनोखा नियम बनवण्यात आला आहे. जिथे विद्यार्थ्यांना पदवी मिळविण्यासाठी किमान १० झाडे लावावी लागतात. सरकारने अधिकृतपणे हा नियम लागू केला आहे.
आता तुम्ही म्हणाल हा नियम नक्की कशासाठी? जेणेकरून तरुणांनी अभ्यासासोबत पर्यावरण संरक्षणातही योगदान द्यावे. या नियमानुसार, विद्यार्थी झाडे लावल्याचा पुरावा दिल्यावरच विद्यापीठातून पदवी मिळवू शकतात. यामागील उद्देश दरवर्षी लाखो नवीन झाडे लावणे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगले वातावरण निर्माण करणे आहे. हे पाऊल शिक्षण केवळ पुस्तकी नाही तर जमिनीवर जबाबदार बनवत आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अभ्यास करायचा नाही. तुमचा अभ्यास करत असताना तुम्ही या पर्यावरणाला पोषक गोष्टी करायला हव्यात असा या देशातील नियम आहे.
Air Force च्या नोकरीचा अर्ज करण्याची शेवटची संधी, IAF Agniveer Vayu Registration 2025 कसे कराल
फिलिपिन्समध्ये पदवीसाठी १० झाडे लावा
जगातील विविध देशांमध्ये ग्रॅज्युएशनच्या पदवीसाठी वेगवेगळे नियम बनवण्यात आले आहेत. पण जर तुम्हाला फिलीपिन्समध्ये ग्रॅज्युएशनची पदवी मिळवायची असेल तर फक्त परीक्षा उत्तीर्ण होणे पुरेसे नाही. १० झाडे लावावी लागतील. तिथल्या सरकारने एक अनोखा कायदा लागू केला आहे. ज्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने पदवीसाठी झाडे लावणे बंधनकारक आहे.
याचा उद्देश देशातील झपाट्याने कमी होत चाललेले वनक्षेत्र वाचवणे आहे. पूर्वी जिथे एकूण वनक्षेत्र ७०% होते, ते आता फक्त २०% पर्यंत कमी झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, सरकारने दरवर्षी १७५ दशलक्षाहून अधिक झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तिथे पदवी मिळविण्यासाठी आता झाडे लावणे ही अट बनली आहे. हे काम पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पदवी मिळू शकत नाही.
AI मुळे पुढील ५ वर्षांत ८० टक्के लोकांच्या नोकऱ्या जाणार, अब्जाधीश विनोद कोसला यांचे धक्कादायक भाकीत
२०१९ मध्ये हा नियम मंजूर करण्यात आला
फिलिपिन्सच्या संसदेने २०१९ मध्ये ‘ग्रॅज्युएशन लेगसी फॉर द एन्व्हायर्नमेंट अॅक्ट’ एकमताने मंजूर केला. या कायद्यानुसार, आता महाविद्यालयीन, हायस्कूल आणि शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदोन्नतीपूर्वी किमान १० झाडे लावावी लागतील.
यासाठी सरकारने खारफुटीची जंगले, लष्करी क्षेत्रे आणि शहरी क्षेत्रे ओळखली आहेत जिथे वृक्षारोपण केले जाईल. या झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी स्थानिक सरकारी संस्थांना देण्यात आली आहे. या नियमाचा उद्देश केवळ झाडे लावणे नाही तर तरुणांमध्ये पर्यावरणाप्रती जबाबदारीची भावना निर्माण करणे आहे.