Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Infrastructure: वर्गखोल्यांची दुरुस्ती, पिण्याचे पाणी अन्… जाणून घ्या १५ व्या वित्त आयोगातून शाळांना कसा मिळणार निधी!

School Infrastructure News : राज्यातील ग्रामीण भागातील शाळांमधील शौचालय, पिण्याचे पाणी, वर्गखोल्यांची दुरुस्ती, वीज, सीसीटीव्ही आणि संरक्षण भिंतीच्या कामांसाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर केला जाणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 12, 2026 | 12:50 PM
school infrastructure

school infrastructure

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील विद्यार्थ्यांच्या शाळेत आता गैरसोयी नकोत
  • १५ व्या वित्त आयोगातून सुविधा उभारणार
  • शौचालय, पाणी, वर्गखोल्या, वीज, सीसीटीव्ही आणि संरक्षण भिंतीच्या कामांना प्राधान्य
School Infrastructure News : राज्यातील शाळेत गेल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वच्छ शौचालय मिळावे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी असावे, वर्गखोली सुरक्षित असावी आणि शाळेच्या परिसरातही सुरक्षित वातावरण असावे, या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आता १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीचा वापर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना शाळांच्या गरजांनुसार प्राधान्याने ही कामे करण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत.

ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शौचालयांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची अडचण, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, वर्गखोल्यांची दुरुस्ती तसेच सुरक्षेच्या सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. विशेषतः मुलींसाठी स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयाची सुविधा महत्त्वाची असल्याने त्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या शाळेत आता गैरसोयी नकोत

बंधित निधीतून सर्वप्रथम मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र मुतारी व शौचालये उभारणे, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शौचालयाची सुविधा करणे, शाळेत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, खराब शौचालयांची दुरुस्ती, आवश्यक साहित्य उपलब्ध करणे आणि पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे अपेक्षित आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, हातपंप, विहीर किंवा पावसाचे पाणी साठवण अशा उपलब्ध स्रोतांचा वापर करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत पाण्यासाठी होणारी गैरसोय कमी होण्याची अपेक्षा आहे.

UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!

ग्रामपंचायतीकडे १५व्या वित्त आयोगाचा शिल्लक निधी असल्यास तो प्रथम या कामांसाठी वापरण्याच्या सूचना आहेत. त्यासाठी ग्रामविकास आराखड्यात आवश्यक बदल करावेत. ग्रामपंचायतीचा निधी अपुरा पडल्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने त्यांच्या शिल्लक निधीतून ही कामे पूर्ण करावीत, असे ग्रामविकास व पंचायतराज विभागाने निर्देश दिले आहेत.

Dasara 2026: डॉ. आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षेची गुप्त कागदपत्रे उघड होणार; जाणून घ्या कधी आणि कसा होणार प्रकाशन सोहळा?

अबंधित निधीतून शाळेचे विविध कामे

अबंधित निधीतून शाळेच्या इमारतीची आणि वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासोबतच विजेची उपकरणे दुरुस्त करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, अग्निशमन उपकरणे उपलब्ध करून देणे आणि शाळेभोवती संरक्षण भिंत उभारणे अशी कामेही करता येणार आहेत.

Web Title: Gram panchayat school infrastructure funds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • maharashtra government school

संबंधित बातम्या

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात
1

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.