Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘CCMP’ उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी व्यवसायाची परवानगी

नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टरांना शासनमान्य CCMP अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर आधुनिक वैद्यकशास्त्राने (अ‍ॅलोपॅथी) उपचार करण्याची परवानगी मिळेल, तर औषध विक्रेत्यांना काही अटींना सामोरे जावे लागणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 27, 2024 | 08:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांना आधुनिक वैद्यकशास्त्र (अ‍ॅलोपॅथी) पद्धतीने व्यवसाय करण्याची परवानगी देण्यासाठी शासनाने विशिष्ट अटी घालून दिल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांनी शासनमान्य सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (CCMP) अभ्यासक्रम पूर्ण केला असल्यास त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्रात वैद्यकीय सेवा देण्याची परवानगी दिली जाईल.

नवीन शैक्षणिक धोरण, वाचन चळवळ, प्राध्यापकांचे प्रशिक्षण यावर विशेष लक्ष-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

काही पात्रता निकष आहेत ज्यांना पात्र असणे अनिवार्य आहे. चला तर मग जाणून घेऊयात या पात्रता निकषांबद्दल. संबंधित वैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत असणे अत्यावश्यक आहे. तसेच त्यांनी शासनमान्य सीसीएमपी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केला असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. ही परवानगी होमिओपॅथी डॉक्टरांसाठी एक मोठी संधी असून त्यांना आधुनिक औषधोपचार पद्धतीत कार्य करण्याची अधिकृत परवानगी मिळेल.

किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांना देखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केलेल्या आणि नोंदणीकृत डॉक्टरांकडून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारावरच औषधांची विक्री करावी. औषध विक्री करताना प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टरांचा नोंदणी क्रमांक, सीसीएमपी सर्टिफिकेट क्रमांक नमूद असल्याची खात्री करणे औषध विक्रेत्यांची जबाबदारी असेल. जर या अटींचे पालन न केले तर औषध विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे वरील सर्व नमूद बाबींचा आढावा घेत त्यांचे पालन करणे जबाबदारी आहे.

या परवानगीमुळे होमिओपॅथी वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांना आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधोपचार करण्याची संधी उपलब्ध होईल. तथापि, यासाठी त्यांनी शासनमान्य मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात पारदर्शकता वाढून रुग्णांच्या आरोग्यासाठी गुणवत्तापूर्ण सेवा देणे शक्य होईल.

CBI मध्ये विविध पदांसाठी भरतीला सुरुवात; इच्छुक उमेदवारांना आजपासून करता येणार अर्ज

शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागांतील रुग्णांना होमिओपॅथी आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या एकत्रित उपचार पद्धतीचा लाभ होईल. यामुळे वैद्यकीय सेवा अधिक परिणामकारक ठरण्याची अपेक्षा आहे. औषध विक्रीमध्ये देखील या परवानगीमुळे अधिक शिस्तबद्धता येईल आणि रुग्णांना योग्य उपचार मिळवण्याचा मार्ग सुलभ होईल. एकंदरीत, या निर्णयाचा फार मोठा फायदा राज्यात पाहायला मिळणार आहे. ग्रामीण भाग असो वा शहरी दोन्ही भागांना या निर्णयाचा पुरेपूर फायदा होणार आहे. अधिक माहितीसाठी, संबंधित वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध विक्रेते यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, शासनमान्य अटी आणि शर्तींचे पालन करावे. यामुळे होणाऱ्या नव्या बदलांचा लाभ वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांना होईल.

Web Title: Homeopathic doctors who have passed ccmp are allowed to practice allopathy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 08:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.