फोटो सौजन्य: iStock
तंत्रज्ञान हे नेहमीच बदलत असतं. यामुळे नक्कीच आपली कामं अजूनच सोपी आणि सोयीस्कर होत असतात. मात्र, याचा फटका नोकरीला सुद्धा बसतो. याचे साधे उदाहरण आपण जाणून घेऊयात. पूर्वी चित्रपटासाठी एखाद्या उंचीवरून व्हिडिओ शॉट घेणयासाठी हेलिकॉप्टर आणि कॅमेरामनची गरज भासायची. मात्र, ड्रोन नावाचे तंत्रज्ञान आले आणि बघता बघता कॅमेरामन आणि हेलिकॉप्टरची गरज पूर्णपणे बंद झाली. आता असेच एक तंत्रज्ञान सगळ्या क्षेत्रात शिरले आहे. याचे नाव म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI).
आजच्या काळात, आर्टिफिशियल इंटेलिजेंसने अनेक क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व निर्माण करत आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या नोकऱ्या जाण्याची भीती वाटत आहे. एआयच्या आगमनानंतर, मोठ्या कंपन्यांमध्ये हजारो लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या. त्याच वेळी, AI मुळे काही नवीन संधी देखील निर्माण झाल्या. जर तुम्हालाही एआयमुळे तुमची नोकरी जाण्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही तुमची नोकरी कशी सुरक्षित ठेवू शकता त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
सध्याची परिस्थिती आणि AI ची वाढती लोकप्रियता पाहता, काही तज्ञांचा असा विश्वास आहे की जर लोक कालांतराने काही स्किल्स म्हणजे कौशल्य विकसित करत राहिले, तर त्यांची मागणी नोकरीच्या बाजारात कायम राहील. त्यांचे म्हणणे आहे की AI ला घाबरण्याऐवजी, लोकांनी त्यांच्या कामासाठी त्याचा अधिक चांगला वापर कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
आजच्या काळात, क्रिएटिव्ह, धोरणात्मक आणि सक्रिय लोकांची खूप मागणी आहे. दुसरीकडे, जर आपण एआयकडे पाहिले तर ते प्रामुख्याने रिपीट काम करते. एआय परिस्थिती आणि संकटानुसार मानवांसारखे क्रिएटिव्ह, धोरणात्मक आणि भावनिक काम करू शकत नाही. एआयला चांगले काम करण्यासाठी मानवी स्पर्शाची आवश्यकता आहे. म्हणूनच, आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा परिणाम अशा क्षेत्रांवर होतोय जिथे फक्त एकाच प्रकारचे काम केले जाते. जसे की डेटा एंट्री. ज्या क्षेत्रात परिस्थितीनुसार नवीन विचार आणि काम आवश्यक आहे, तिथे AI लोकांच्या नोकऱ्या घेऊ शकत नाही.
एआयपासून नोकऱ्या वाचवण्यासाठी, लोकांनी त्यांची क्रिएटिव्हिटी आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. एआयमध्ये टीमवर्क, नेतृत्वगुण आणि क्रिएटिव्ह विचारसरणीमध्ये माणसांसारखी विचार करण्याची क्षमता नाही. म्हणून त्यावर काम करा. कालांतराने छोटे छोटे अभ्यासक्रम करा आणि नवीन कौशल्ये शिका. त्याच वेळी, दैनंदिन कामांमध्ये एआय टूल्सचा वापर करा आणि त्यातून मिळणारा मोकळा वेळ स्वतःला ज्ञानी बनवण्यासाठी वापरा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख एआय टूल्स आणि तंत्रज्ञानाबद्दल अपडेट माहिती ठेवा.