career (फोटो सौजन्य: social media )
अनेक चित्रपटात तुम्ही कोर्टरूम ड्रामा बघितलं असेल. परंतु तुम्ही कधी प्रत्यक्षात जजच्या कुर्सीवर बसलेल्या व्यक्तीला पाहिलं आहे का? ते फक्त एक माणूस नाही तर न्यायाचे प्रतीक आहे. लोक त्यांना ‘Your Honour’ म्हणतात आणि त्याच्या प्रत्येक शब्दात कोणाचेही जीवन बदलण्याची शक्ती आहे.न्यायाधीशाचे काम फक्त खटले निकाली काढणे नसते. ते समाजात न्याय, संतुलन आणि विश्वास निर्माण करण्याचे काम देखील करतात.
CP राधाकृष्णन ठरले उपराष्ट्रपती पदासाठी NDA उमेदवार; काय आहे त्यांचे शिक्षण? जाणून घ्या
अनेक कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न असतो तो म्हणजे LLB केल्यानंतर न्यायाधीश होऊ शकतो का? तर त्याच उत्तर आहे हो. पण त्या साठी काही ठरलेल्या परीक्षा आणि शिस्त, सतत अभ्यास आणि कायद्याची सखोल समज असणे आवश्यक आहे.
न्यायाधीश होण्यासाठी पात्रता काय?
वेगवेगळ्या न्यायालयांनुसार न्यायाधीशांची पात्रता देखील वेगळी आहे.भारतात न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक असलेला अनुभवाचा कालावधी पदाच्या प्रकारावर आणि न्यायालयीन सेवेवर अवलंबून असतो. जर तुम्हाला न्यायाधीश बनायचे असेल तर तुम्हाला हे समजून घेणं गरजेचे आहे की ही एक मोठी जबाबदारी आहे. एक चुकीचा निर्णय आणि एखाद्याच संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. यासाठी संयम, निष्पक्ष विचारसरणी आणि दृढ निर्णय घेण्याची क्षमता सर्वात महत्वाची आहे. जर तुम्ही मेहनती आणि प्रामाणिक असाल, कायदा आणि न्यायावर विश्वास ठेवत असाल तर हा करिअर पर्याय तुमच्यासाठी परिपूर्ण असू शकतो.
वेगवेगळ्या न्यायालयांनुसार न्यायाधीशांची पात्रता काय?
कनिष्ठ न्यायिक सेवा (कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश/न्यायिक दंडाधिकारी)
अनुभव : साधारणपणे, कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश/न्यायिक दंडाधिकारी पदावर प्रवेश घेण्यासाठी कोणताही अनुभव आवश्यक नसतो. अनेक राज्यांमध्ये, नवीन कायदा पदवीधर (LLB धारक) थेट न्यायिक सेवा परीक्षेला बसू शकतात.
पात्रता: उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी पदवी असणे आवश्यक आहे. तो बार कौन्सिल ऑफ इंडियामध्ये वकील म्हणून नोंदणीकृत असावा. काही राज्यांमध्ये किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे आहे (राखीव प्रवर्गासाठी सूटसह).
टीप: काही राज्यांमध्ये १-२ वर्षांचा प्रॅक्टिस अनुभव आवश्यक असू शकतो परंतु तो अनिवार्य नाही.
उच्च न्यायिक सेवा (जिल्हा न्यायाधीश/अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश)
अनुभव: उच्च न्यायिक सेवेत प्रवेश घेण्यासाठी वकिलीचा किमान ७ वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे. हा अनुभव उच्च न्यायालय किंवा अधीनस्थ न्यायालयात वकिलीचा असावा.
पात्रता: उमेदवार बार कौन्सिलमध्ये नोंदणीकृत वकील असावा आणि उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिलीचा अनुभव देखील आवश्यक आहे. वयोमर्यादा सहसा ३५-४५ वर्षांच्या दरम्यान असते.
निवड प्रक्रिया: निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि अनुभवाच्या आधारे केली जाते.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता (हाई कोर्ट जज)
अनुभव: उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी किमान १० वर्षांचा सतत कायदेशीर अनुभव आवश्यक आहे. यामध्ये उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिसचा समावेश असावा. संविधानाच्या कलम २१७ नुसार, उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे न्यायिक क्षेत्रात विशेष पात्रता असणे आवश्यक आहे.
निवड: उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कॉलेजियम प्रणालीद्वारे केली जाते. यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या वरिष्ठ न्यायाधीशांच्या शिफारशींचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता (सुप्रीम कोर्ट जज)
अनुभव: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी, उमेदवाराला उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून ५ वर्षांचा अनुभव किंवा उच्च न्यायालयात १० वर्षांचा सतत प्रॅक्टिस असणे आवश्यक आहे. पर्यायीरित्या, उमेदवार कायद्याच्या क्षेत्रातील एक प्रख्यात कायदेतज्ज्ञ असावा.
निवड: नियुक्ती कॉलेजियम प्रणालीद्वारे केली जाते.
३ किंवा ७ वर्षे, अनुभवाबाबतची पात्रता काय आहे?
३ वर्षांचा अनुभव: कनिष्ठ न्यायालयीन सेवेसाठी साधारणपणे ३ वर्षांचा अनुभव अनिवार्य नाही, परंतु काही राज्यांमध्ये वकिलासाठी हा किमान अनुभव आवश्यक असू शकतो.
७ वर्षांचा अनुभव: उच्च न्यायालयीन सेवेसाठी (जसे की जिल्हा न्यायाधीश) हे अनिवार्य आहे.