Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bullet Train Driver : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा ड्रायव्हर कसे व्हावे? जाणून घ्या पात्रता,निवड प्रक्रिया अन् पगार!

How To Become Bullet Train Driver In India : बुलेट ट्रेनचा ड्रायव्हर होण्यासाठी अर्ज प्रक्रिया नेमकी काय आहे आणि या पदासाठी पगार किती मिळतो याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 23, 2026 | 10:24 AM
bullet train

bullet train

Follow Us
Follow Us:

How To Become Bullet Train Driver In India: देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत म्हणजेच मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोअरबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर बुलेट ट्रेनचा ड्रायव्हर होण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया असते, असा प्रश्न अनेक तरुणांच्या मनात निर्माण होत आहे. ‘नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ या संपूर्ण प्रकल्पाचे संचालन करत असून, याच संस्थेकडून बुलेट ट्रेन चालकांची म्हणजेच HSR पायलटची भरती केली जाते. या पदासाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि मिळणारा पगार याबाबतची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

‘HSR पायलट’ म्हणजे काय?

बुलेट ट्रेन चालवणाऱ्या व्यक्तीला सामान्य भाषेत ड्रायव्हर म्हटले जात असले, तरी अधिकृतपणे या पदाला HSR पायलट असे संबोधले जाते. हे पद थेट फ्रेशर्ससाठी (नवीन उमेदवारांसाठी) उपलब्ध नसते. यासाठी भारतीय रेल्वे आणि मेट्रो प्रणालीमध्ये आधीपासून कार्यरत असलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांना संधी दिली जाते. NHSRCL कडून थेट भरतीद्वारे रेल्वे आणि मेट्रोमधील योग्य व अनुभवी उमेदवारांची या पदासाठी निवड केली जाते.

कशी होते निवड प्रक्रिया?

अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. या टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. काही वेळेस भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा किंवा इतर मूल्यमापन फेऱ्यांचाही समावेश केला जातो; त्यामुळे प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना हाय-स्पीड ट्रेनच्या संचालनातील तांत्रिक बारकावे समजण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती

कुठे आणि कसा करावा अर्ज?

बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित सर्व भरती प्रक्रियांसाठी NHSRCL च्या अधिकृत संकेतस्थळावरून (nhsrcl.in) अर्ज करावा लागतो. जेव्हा जेव्हा HSR पायलट किंवा इतर पदांची भरती निघते, तेव्हा त्याची सविस्तर माहिती आणि बातमी या संकेतस्थळाच्या ‘Career’ विभागात प्रसिद्ध केली जाते. इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी या वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे.

किती असतो पगार?

बुलेट ट्रेन चालकाचा पगार हा त्यांचा अनुभव आणि सेवा ज्येष्ठतेनुसार ठरवला जातो. नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेनुसार, या पदासाठी दरमहा ₹४०,००० ते ₹१,१०,००० किंवा त्याहून अधिक वेतन दिले जाते, ज्यामध्ये इतर विविध भत्त्यांचाही समावेश असतो.

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू

भारतीय रेल्वेतील सामान्य लोको पायलटला मिळणाऱ्या सरासरी पगाराच्या (सुमारे ₹५९,८०० प्रति महिना) तुलनेत हे वेतन अत्यंत आकर्षक मानले जाते. त्यामुळेच रेल्वे आणि मेट्रोमधील अनेक अनुभवी लोको पायलट व ट्रेन ऑपरेटर या पदासाठी अर्ज करण्यास उत्सुक आहेत.

Web Title: How to become bullet train driver in india nhsrcl hsr pilot qualification salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • Bullet Train

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.