Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरू प्रवास होणार सुपरफास्ट! वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा; महाराष्ट्रालाही मोठा फायद

Vande Bharat Sleeper Train : बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या रेल्वे सेवेमुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील प्रवाशांना फायदा होणार असून पंतप्रधान मोदींनी या सेवेला गेमचेंजर म्हटले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 01, 2026 | 06:28 PM
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरू प्रवास होणार सुपरफास्ट! वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा; महाराष्ट्रालाही मोठा फायद

Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरू प्रवास होणार सुपरफास्ट! वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा; महाराष्ट्रालाही मोठा फायद

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रासह तीन राज्यांना फायदा
  • बुलेट ट्रेनच्या नॉर्दर्न कॉरिडॉरलाही मंजुरी
  • दिल्ली ते वाराणसी अवघ्या 3 तासात शक्यॉ
 

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई व बंगळुरू या दोन महत्त्वांच्या शहरांमधील प्रवास वेगवान व आरामदायी करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने रविवारी मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनला (Vande Bharat Sleeper Train) हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या एक्स्प्रेसचं स्वागत करताना ही सेवा दोन्ही शहरांना जोडण्यासाठी ‘गेमचेंजर’ ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर भारतीय रेल्वेची पोस्ट शेअर करत या नव्या सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. बंगळुरूमधून सुरू झालेली ही रेल्वे सेवा देशातील आधुनिक रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, तंत्रज्ञान आणि नवसंकल्पनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमधून रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेन दोन्ही महानगरांमधील संपर्कव्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरेल.

महाराष्ट्रासह तीन राज्यांना फायदा

या नव्या रेल्वे सेवेमुळे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना फायदा होणार आहे. विशेषतः तरुण, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी ही सेवा उपयुक्त ठरेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. प्रवास अधिक आरामदायी आणि सुविधाजनक होण्यास या रेल्वे सेवेमुळे मदत मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात आधुनिक सुविधा आणि उत्तम प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

Rahul Gandhi : ‘भाजपने दुकाने सक्तीने बंद पाडली,’ राहुल गांधींचा गंभीर आरोप, दिल्लीत नेमकं काय घडलं?

बुलेट ट्रेनच्या नॉर्दर्न कॉरिडॉरलाही मंजुरी

दरम्यान, देशातील बुलेट ट्रेन नेटवर्कच्या नॉर्दर्न कॉरिडॉरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिली होती. वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसच्या शुभारंभादरम्यान त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली.

प्रस्तावित बुलेट ट्रेन कॉरिडॉर दिल्ली, आग्रा, कानपूर, लखनौ, अयोध्या, प्रयागराज, वाराणसी, पाटणा आणि सिलीगुडी या शहरांना जोडणार असून पुढे गुवाहाटीपर्यंत विस्तारण्याची योजना आहे.

Omar Abdullah Marriage: घटस्फोटानंतर तीन महिन्यांनी उमर अब्दुल्ला यांनी थाटला संसार; पत्रकार निधी राजदान यांच्याशी केला विवाह

दिल्ली ते वाराणसी अवघ्या 3 तासात शक्य

या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असल्याचा दावा रेल्वेमंत्र्यांनी केला आहे. प्रस्तावित वेळापत्रकानुसार दिल्ली ते आग्रा प्रवास 59 मिनिटांत, दिल्ली ते कानपूर 1 तास 45 मिनिटांत, दिल्ली ते लखनौ 2 तास 12 मिनिटांत, तर दिल्ली ते वाराणसी प्रवास 3 तास 33 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. लखनौ ते वाराणसी हे अंतर अवघ्या 1 तास 21 मिनिटांत पार करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

बुलेट ट्रेन सर्वसामान्यांच्याही आवाक्यात : रेल्वेमंत्री

बुलेट ट्रेन ही केवळ श्रीमंतांसाठीच असेल, असा विरोधकांकडून केला जाणारा आरोप रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेटाळला. विमान प्रवासाच्या तुलनेत बुलेट ट्रेनचे तिकीटदर कमी असतील आणि सर्वसामान्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशात वेगवान, आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणारी परिवहन व्यवस्था विकसित करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनला कधी हिरवा झेंडा दाखवण्यात आला?

    Ans: रविवार, 1 नोव्हेंबर 2026 रोजी या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.

  • Que: वंदे भारत स्लीपर ट्रेनचा कोणत्या राज्यांना फायदा होणार आहे?

    Ans: महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांतील प्रवाशांना या सेवेचा फायदा होणार आहे.

  • Que: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे सेवेबाबत काय म्हटले?

    Ans: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेन दोन्ही महानगरांमधील कनेक्टिव्हिटीसाठी गेमचेंजर ठरेल, असे मोदी यांनी म्हटले आहे.

Web Title: Bengaluru mumbai vande bharat sleeper train flagged off pm modi rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Bullet Train
  • delhi
  • narendra modi

संबंधित बातम्या

‘पंजाबी लोकांना लढायला शिकवू नका’; CJP आंदोलनावरून दिलजीत दोसांझ चर्चेत! समाजाबद्दलच्या वक्तव्यावर अभिजीत दिपके काय म्हणाले?
1

‘पंजाबी लोकांना लढायला शिकवू नका’; CJP आंदोलनावरून दिलजीत दोसांझ चर्चेत! समाजाबद्दलच्या वक्तव्यावर अभिजीत दिपके काय म्हणाले?

BJP PM Candidate: 2029 मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? मोदी, योगी की…; अमित शाहा यांनी स्पष्टच सांगितलं
2

BJP PM Candidate: 2029 मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? मोदी, योगी की…; अमित शाहा यांनी स्पष्टच सांगितलं

PM Kisan Yojana 24th Installment : खुशखबर! आला रे… PM Kisan Yojana चा  24 वा हफ्ता आला! तब्बल 9.34 कोटी शेतकऱ्यांना मिळाला लाभ
3

PM Kisan Yojana 24th Installment : खुशखबर! आला रे… PM Kisan Yojana चा 24 वा हफ्ता आला! तब्बल 9.34 कोटी शेतकऱ्यांना मिळाला लाभ

Indian Racing Festival : 13  वर्षांनंतर बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर रेसिंगचा थरार; इंडियन रेसिंग फेस्टिव्हल सज्ज
4

Indian Racing Festival : 13 वर्षांनंतर बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर रेसिंगचा थरार; इंडियन रेसिंग फेस्टिव्हल सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.