
फोटो सौजन्य - Social Media
बालपणापासूनच ट्रेनिंग घेतली तर बेसिक राइडिंग स्किल्स, बॅलन्स, कंट्रोल आणि स्पीड यांचा पाया मजबूत होतो. हा पाया तयार झाला की पुढचे शिक्षण अगदी अवगत होते. शिक्षण म्हणजे काय? तर Honda Ten10 Racing Academy, CRA Motorsports, Apex Racing Academy, Rajini Academy of Competitive Racing (RACR) यांसारख्या रेसिंग स्कूलमध्ये प्रोफेशनल ट्रेनिंग घेणे आणि ही फार गरजेची असते. येथे राइडिंगबद्दल सारं काही शिकवले जाते.
शिकून परिपक्व झाल्यावर विविध स्पर्ध्यांमध्ये भाग घ्या. मग त्या राज्यस्तरीय असो वा देशस्तरीय! भाग घेत चला. पण त्या अगोदर FMSCI (Federation of Motor Sports Clubs of India) मान्यताप्राप्त रेसिंग लायसन्स मिळवा आणि मग Indian National Motorcycle Racing Championship (INMRC) किंवा One Make Championship (TVS, Honda, Yamaha) मध्ये भाग घ्या. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पोडियम फिनिश किंवा टॉप टाइमिंग मिळवणे महत्त्वाचे असते त्यामुळे टीम्स, स्पॉन्सर्स आणि टॅलेंट स्काऊट्स यांचे लक्ष आपल्याकडे जाते.
जर तुम्हाला Moto GP मध्ये जायचे असेल तर Asia Talent Cup, Red Bull Rookies Cup, FIM CEV Repsol Championship या आंतरराष्ट्रीय स्पर्ध्येत सहभाग घ्या. येथे जिंकून Moto ३ मध्ये एंट्री मिळवा. मग Moto २ मध्ये एंट्री आणि शेवटी तुमचे ध्येय Moto GP मध्ये तुम्ही पोहचला असाल. प्रत्येक लेव्हलवर टीम्स तुमची स्किल, कन्सिस्टन्सी आणि प्रोफेशनल ऍप्रोच तपासतात. MotoGP पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत, स्पर्धा आणि अनुभव गरजेचा असतो. अपयश, अपघात, प्रेशर सगळ्याला सामोरे जात राहणं आवश्यक.