फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल बोर्ड ऑफ स्कुल एजुकेशन (CBSE)ने काही महिन्यांपूर्वी भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. दरम्यान, या भरतीमध्ये अर्ज करून सहभाग घेणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ३ डिसेंबर २०२४ रोजी, या भरतीसंदर्भात Exam City Details जाहीर करण्यात आले आहेत. अर्ज कर्त्या उमेदवारांना याची नोंद घेता येणार आहे. परंतु, आधी या भरती संदर्भात अधिक माहितीस जाणून घेऊयात. या भरतीचे आयोजन सेंट्रल बोर्ड ऑफ स्कुल एजुकेशन (CBSE)ने केले आहे. १७ सप्टेंबर २०२४ पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची उमेदवारांना मुभा देण्यात आली होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर 2024 निश्चित करण्यात आली होती. तसेच उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे होते. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
केलेल्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्यांच्यात वेळीच सुधार करण्यास काही वेळ जाहीर करण्यात होता. २१ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबरदरम्यान या त्रुटींना सुधारण्यासाठी वेळ देण्यात आला होता. १४ डिसेंबर रोजी या भरतीसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेला उपस्थित राहता येणार आहे. तसेच परीक्षेच्या किमान २ दिवसांआधी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज कर्त्या उमेदवारांनी प्रवेश पत्राला ऑनलाईन स्वरूपात पहावे तसेच त्याला डाउनलोड करावे. जानेवारी २०२५ च्या उत्तरार्धात या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मुळात, या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र कराव्या लागणार आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत. CTET परीक्षा दोन स्तरांसाठी घेतली जाते, ज्यामध्ये प्राथमिक शिक्षक (PRT) (स्तर-1) हे इयत्ता 1 ते 5 च्या शिक्षकांसाठी आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (स्तर-2) हे इयत्ता 6 ते 8 च्या शिक्षकांसाठी असतात. स्तर-1 साठी पात्रता 12वी उत्तीर्ण तसेच D.Ed., JBT, B.El.Ed. किंवा B.Ed. या अभ्यासक्रमांपैकी कोणतेही एक पूर्ण असणे आवश्यक आहे. स्तर-2 साठी पात्रता म्हणजे पदवी उत्तीर्ण आणि त्यासोबत B.Ed. किंवा B.El.Ed. पूर्ण असणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे डाउनलोड करता येईल प्रवेश पत्र