Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

How to Get a Job in Google: गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या तज्ज्ञांच्या ५ महत्त्वाच्या टिप्स..

How to Get a Job in Google: गुगलमध्ये नोकरी कशी मिळवावी? Gemini AI चा वापर करून रेझ्युमे कसा बनवावा आणि मुलाखतीसाठी STAR फॉर्म्युला कसा वापरावा जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 26, 2026 | 10:21 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • गुगलमध्ये नोकरी कशी मिळेल?
  • मुलाखतींच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी STAR फॉर्म्युला वापरा
  • युजर्सच्या गरजांची काळजी घेणाऱ्या उमेदवारांना प्राध्यान्य
How to Get a Job in Google:  प्रत्येक IT आणि Non-IT प्रोफेशनलचे कधी ना कधी गुगलमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असते. परंतु, गुगलमध्ये निवड फक्त एक शानदार रेझ्युमेने केली जात नाही. यासाठी योग्य रणनीती, मुलाखतीची उत्तम तयारी आणि कंपनीच्या विचारसरणीला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. गुगलचे टेक्निकल रिक्रूटर बेन मीड यांनी गुगलमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ५ अतिशय उपयुक्त आणि प्रभावी टिप्स शेअर केल्या आहेत.

फ्रँकलिन पियर्स युनिव्हर्सिटीमधून सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएट असलेल्या बेन मीड यांचा हा सल्ला उमेदवारांसाठी गेमचेंजर ठरू शकतो. गुगलमध्ये निवडीसाठी आपल्या स्किल्स (कौशल्ये) योग्य पद्धतीने मांडता येणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे. जर तुम्हीही गुगल किंवा इतर कोणत्याही मोठ्या टेक कंपनीत ड्रीम जॉब मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर हे ५ खास टिप्स अप्लाय करून तुमचा रेझ्युमे अधिक चांगला बनवू शकता. गुगल रिक्रूटरचे ५ गुरुमंत्र तुमच्या निवडीची शक्यता वाढवू शकतात.

गुगलमध्ये नोकरी कशी मिळेल?

गुगल ही देशातील सर्वात प्रतिष्ठित टेक कंपन्यांपैकी एक आहे. गुगलमधील नोकरीची प्रक्रिया बरीच लांब आणि किचकट असते. जर तुम्ही गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये हाय-पेइंग नोकरीची तयारी करत असाल, तर हे टिप्स तुमच्या उपयोगास येऊ शकतात:

१. AI टूल्सचा स्मार्ट वापर: Gemini सह रेझ्युमे कस्टमाइज करा

बेन मीड उमेदवारांना मास्टर रेझ्युमे तयार करण्याचा सल्ला देतात. हा रेझ्युमे ३ ते ४ पानांचा असू शकतो. यामध्ये तुमचे सर्व अनुभव, प्रोजेक्ट्स आणि अचिव्हमेंट्स समाविष्ट करा. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात, त्याचे जॉब डिस्क्रिप्शन गुगलच्या Gemini AI मध्ये टाकून तुमचा मास्टर रेझ्युमे त्या रोलनुसार कस्टमाइज करा. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि योग्य अनुभव हायलाइट होईल.

२. फोकस ठेवून अर्ज करा: प्रत्येक पोस्टसाठी फॉर्म भरू नका

अनेकदा लोक एकाच कंपनीत दिसणाऱ्या १५-२० वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी अर्ज करतात. ही खूप मोठी चूक आहे आणि कंपनीच्या नजरेत हा एक ‘रेड फ्लॅग’ आहे. गुगल रिक्रूटरचे म्हणणे आहे की, २० वेगवेगळ्या पदांवर अर्ज करण्याऐवजी फक्त त्या २ ते ३ रोलवर लक्ष केंद्रित करा, जे तुमच्या अनुभवाशी सर्वात जास्त जुळत असतील. गुगलमध्ये नोकरीचा अर्ज भरण्यापूर्वी जॉबची किमान आणि पसंतीची पात्रता नीट तपासून घ्या.

Government Salary & Grade Pay: सरकारी नोकरीत ”ग्रेड-पे’चा अर्थ काय? जाणून घ्या बेसिक सॅलरी आणि इन-हैंड पगाराचे गणित!

३. STAR मेथडने मुलाखतीची तयारी करा

मुलाखतींच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बेन मीड यांनी STAR फ्रेमवर्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. STAR चा अर्थ खालीलप्रमाणे आहे:

  • Situation (स्थिती): समस्या किंवा परिस्थिती काय होती?
  • Task (कार्य): तुमची जबाबदारी काय होती?
  • Action (कृती): तुम्ही कोणती पावले उचलली?
  • Result (निकाल): त्याचा काय परिणाम झाला?
या पद्धतीने दिलेले उत्तर स्ट्रक्चर्ड आणि प्रभावी वाटते.

४. प्रॉब्लेम-सॉल्व्हिंग अप्रोच दाखवा

गुगलमधील मुलाखतकार केवळ तुम्हाला काय येते हे पाहत नाहीत, तर तुम्ही कसा विचार करता हेदेखील तपासतात. जेव्हाही एखादा ओपन किंवा कठीण प्रश्न विचारला जाईल, तेव्हा सरळ उत्तर देण्याऐवजी आधी तुमचे गृहीतके स्पष्ट करा. त्यानंतर मुलाखतकाराला प्रश्न विचारून स्पष्टता मिळवा. तुमचे विचार लॉजिकल पद्धतीने मांडणे हीच तुमची खरी क्षमता दर्शवते.

MTech vs MBA After BTech: इंजिनिअरिंगनंतर एमटेक फायद्याचे की एमबीए? कोणत्या क्षेत्रात आहे बक्कळ पैसा?

५. गुगलच्या व्हॅल्यूज आणि टीम वर्कवर फोकस करा

गुगल अनिश्चितता हाताळण्याची क्षमता असणाऱ्या लोकांना अधिक प्राधान्य देते. गुगलमध्ये अशा लोकांची भरती केली जाते, जे युजर्सच्या गरजांची काळजी घेण्यास आणि नैतिक निर्णय घेण्यास सक्षम असतात. गुगल मुलाखतीमध्ये अशी उदाहरणे शेअर करा, ज्यावरून हे स्पष्ट होईल की तुम्ही एखाद्या संकटात कसे काम केले आणि तुमच्यामुळे टीमला काय यश मिळाले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुगलसाठी रेझ्युमे तयार करताना कोणत्या AI टूलचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो?

    Ans: जॉब डिस्क्रिप्शननुसार मास्टर रेझ्युमे कस्टमाइज करण्यासाठी गुगलच्या Gemini AI चा स्मार्ट वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

  • Que: मुलाखतीदरम्यान प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कोणती पद्धत वापरावी?

    Ans: मुलाखतीसाठी STAR मेथड (Situation, Task, Action, Result) वापरून स्ट्रक्चर्ड पद्धतीने उत्तर देण्याचा सल्ला दिला जातो.

  • Que: एकाच कंपनीत वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करणे योग्य आहे का?

    Ans: नाही, एकाच कंपनीत १५-२० वेगवेगळ्या पदांवर अर्ज करणे हा कंपनीच्या नजरेت 'रेड फ्लॅग' ठरू शकतो; त्याऐवजी फक्त २ ते ३ योग्य रोल्सवरच लक्ष केंद्रित करावे.

Web Title: How to get a job in google recruiter tips marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • google
  • High salary Job
  • Interview for Jobs
  • job news

संबंधित बातम्या

MTech vs MBA After BTech: इंजिनिअरिंगनंतर एमटेक फायद्याचे की एमबीए? कोणत्या क्षेत्रात आहे बक्कळ पैसा?
1

MTech vs MBA After BTech: इंजिनिअरिंगनंतर एमटेक फायद्याचे की एमबीए? कोणत्या क्षेत्रात आहे बक्कळ पैसा?

BMC Bhagwati Hospital Recruitment 2026: मुंबईत एमबीबीएस डॉक्टरांसाठी नोकरीची मोठी संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती!
2

BMC Bhagwati Hospital Recruitment 2026: मुंबईत एमबीबीएस डॉक्टरांसाठी नोकरीची मोठी संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती!

Fitness Coach: टीम इंडियाचा फिटनेस कोच कसे बनावे? जाणून घ्या पात्रता, शिक्षण आणि संपूर्ण प्रक्रिया!
3

Fitness Coach: टीम इंडियाचा फिटनेस कोच कसे बनावे? जाणून घ्या पात्रता, शिक्षण आणि संपूर्ण प्रक्रिया!

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित
4

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.