Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Bhagwati Hospital Recruitment 2026: मुंबईत एमबीबीएस डॉक्टरांसाठी नोकरीची मोठी संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती!

BMC Bhagwati Hospital Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयात एमबीबीएस पदवीधारकांसाठी आवास अधिकारी पदाच्या ३ जागांवर थेट मुलाखत. २ नोव्हेंबर २०२६ रोजी मुलाखत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 24, 2026 | 05:34 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • आवास अधिकारी पदासाठी थेट मुलाखत
  • शैक्षणिक पात्रता आणि वेतन
  • महत्त्वाच्या अटी व कालावधी
BMC Bhagwati Hospital Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अंतर्गत येणाऱ्या श्री. हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, बोरीवली (प.) येथे ‘आवास अधिकारी’ पदाच्या जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण ३ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि वेतन:

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेची एमबीबीएस पदवी असणे आवश्यक असून, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (Maharashtra Medical Council) कायमस्वरूपी नोंदणी असणे अपरिहार्य आहे. तसेच, उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असून अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना मूळ वेतन ६,६०० रुपये, ३,३०० रुपये डी.पी., नियमांनुसार महागाई भत्ता आणि २७,००० रुपये SAC असे एकत्रित दरमहा वेतन दिले जाईल.

मुलाखतीची तारीख आणि वेळ:

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला पासपोर्ट आकाराचा फोटो असलेला अर्ज, बायोडाटा, शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रतींसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखत आणि नोंदणीचे ठिकाण ‘प्रमुख वैद्यकीय अधिकारी (CMO) कार्यालय, पहिला माळा, खोली क्र. २६, श्री. हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, बोरीवली (प.), मुंबई – ४००१०३’ हे आहे. नोंदणी दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते १०:३० या वेळेत होईल, तर मुलाखत सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० या वेळेत पार पडेल. नोंदणीची वेळ संपल्यानंतर येणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीत सहभागी होण्याची संधी मिळणार नाही.

इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी मोठी बातमी! SSC JE Exam 2026 ची एक्झाम सिटी स्लिप अधिकृत वेबसाईटवर जाहीर

महत्त्वाच्या अटी व कालावधी:

सदर पदावरील नियुक्तीचा कालावधी नियुक्ती दिनांकापासून ३१ जानेवारी २०२७ पर्यंत असेल. ही पदे महानगरपालिकेची नियमित पदे नसून, निवड झालेल्या उमेदवारांना पालिकेचे नियमित कर्मचारी मानले जाणार नाही. तसेच नियुक्तीच्या वेळी १०,००० रुपयांची अनामत रक्कम डिमांड ड्राफ्ट किंवा चलनाद्वारे जमा करावी लागेल, जी संपूर्ण सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर परत केली जाईल. याविषयीची सविस्तर माहिती आणि अटी रुग्णालयाच्या माध्यमातून व अधिकृत जाहिरातीत पाहता येतील.

AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही भरती कोणत्या रुग्णालयात आणि कोणत्या पदासाठी होत आहे?

    Ans: ही भरती मुंबईतील श्री. हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, बोरीवली (प.) येथे 'आवास अधिकारी' (Tenure Post) पदासाठी होत आहे.

  • Que: या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

    Ans: उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेची एमबीबीएस (MBBS) पदवी आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे कायमस्वरूपी नोंदणी असणे आवश्यक आहे.

  • Que: थेट मुलाखतीची तारीख आणि वेळ काय आहे?

    Ans: मुलाखत २ नोव्हेंबर २०२६ रोजी आहे. नोंदणी सकाळी १०:०० ते १०:३० पर्यंत होईल आणि मुलाखत सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० या वेळेत पार पडेल.

Web Title: Bmc bhagwati hospital resident medical officer recruitment 2026 marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Contract Basis Job
  • Interview for Jobs
  • MBBS

संबंधित बातम्या

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! Project Administrative Assistant पदासाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती
1

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! Project Administrative Assistant पदासाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

Supreme Court Recruitment 2026: सर्वोच्च न्यायालयात ६५ जागांवर भरती; पदवीधरांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू!
2

Supreme Court Recruitment 2026: सर्वोच्च न्यायालयात ६५ जागांवर भरती; पदवीधरांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू!

Reddit Viral Story: कोणतेही काम न करता कमावले तब्बल ४.७ कोटी रुपये! कॉर्पोरेट जगतातील थक्क करणारी व्हायरल घटना एकदा वाचाच
3

Reddit Viral Story: कोणतेही काम न करता कमावले तब्बल ४.७ कोटी रुपये! कॉर्पोरेट जगतातील थक्क करणारी व्हायरल घटना एकदा वाचाच

Medical Career Tips: मेडिकलच्या विद्यार्थ्यांना रोज किती तास करावा अभ्यास? कशात स्पेशलायझेशन करावे?
4

Medical Career Tips: मेडिकलच्या विद्यार्थ्यांना रोज किती तास करावा अभ्यास? कशात स्पेशलायझेशन करावे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.