फोटो सौजन्य - Social Media
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS)ने बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी फार महत्वाची बातमी जाहीर केली आहे. दरम्यान, या वेळापत्रकात २०२५ -२६ वारशांमध्ये होणाऱ्या महत्वाच्या भरतीच्या प्रक्रियेविषयी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यास तसेच करिअर घडवण्यात इच्छुक आहात तर नक्कीच तुम्ही या वेळापत्रकाचा आढावा घेत. भरती तसेच भरती संदर्भात आयोजित असलेल्या परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात करू शकता. चला अंतर मग जणू घेऊयात, IBPS ने जाहीर केलेले हे वेळापत्रक:
ऑफिस असिस्टंट प्रिलिम्स परीक्षा ऑगस्ट २०२५ च्या ३० तारखेला तर सप्टेंबर २०२५ च्या ६ आणि ७ तारखेला जाहीर करण्यात आली आहे. ऑफिस ऑफिसर स्केल १ प्रिलिम्स परीक्षेचे आयोजन २७ जुलै २०२५ रोजी आणि २३ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले आहे. ऑफिसर स्केल २ परीक्षा, ३ सिंगल परीक्षा १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ऑफिसर स्केल १ परीक्षा १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ऑफिस असिस्टंटस परीक्षेचे आयोजन ९ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. वरील तारखा IBPS RRBs संबंधित आहेत.
तर दरवर्षी IBPS क्लार्कच्या रिक्त पदांना भरण्यासाठी उमेदवारांची नियुक्ती करते. प्रिलिम्स परीक्षा ६ डिसेंबर २०२५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान आणि १३ डिसेंबर २०२५ ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. क्लार्क मेन्स परीक्षा १ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येईल. IBPS दरवर्षी प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदासाठी भरतीचे आयोजन करते. या भरतीच्या माध्यमातून अनेक उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची नियुक्तीस पात्र होण्याची संधी मिळते.
जर तुम्ही PO पदासाठी इच्छुक आहात तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे कि, ४ ऑक्टोबर २०२५, ५ ऑक्टोबर २०२५ तसेच ११ ऑक्टोबर २०२५ रोजी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मेन्स परीक्षेचे आयोजन २९ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. IBPS स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदासाठी भरतीचे आयोजन करते. २२ नोव्हेंबर २०२५ तसेच २३ नोव्हेंबर २०२५ पदासाठी ही भरती आयोजली गेली आहे. तसेच मेन्स परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित केली गेली आहे.