फोटो सौजन्य - Social Media
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. एकूण ४११ रिक्त जजागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. देशाच्या गृहखात्यात उमेदवारांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन स्वरूपात करायचे आहे. महत्वाची बाब म्हणजे उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवातही केली आहे. ११ जानेवारी २०२५ पासून या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तसेच उमेदवारांना २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच जे रिमॉर्ट क्षेत्रातून येतात त्यांना ११ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य क्षेत्रातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५० रुपये भरावे लागणार आहेत. OBC तसेच EWS या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच PWD प्रवर्गातील उमेदवारांनादेखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. या भरतीमध्ये MSW Cook पदासाठी १५३ जागा रिक्त आहेत. तर MSW Mason पदासाठी १७२ जागा रिक्त आहेत. MSW Blacksmith पदासाठी ७५ जागा रिक्त आहेत, तर MSW Mess Waiter ११ जागा रिक्त आहेत.
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर या भरतीसाठी जास्तीत जास्त वय २५ वर्षे निश्चित करण्यात आला आहे. विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे. त्या जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. एकूण ५ टप्प्यांमध्ये ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये लेखी परीक्षेचा समावेश आहे. फिजिकल एफिशिअन्सी टेस्ट, प्रॅक्टिकल टेस्ट, दस्तऐवजांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीचा समावेश आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज