
फोटो सौजन्य - Social Media
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील (RRB) भरतीसाठी महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. IBPS RRB Office Assistant (Clerk) आणि Officer Scale (I, II, III) पदांसाठी होणाऱ्या परीक्षांचे IBPS RRB Admit Card 2025 अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षांसाठी अर्ज केलेले उमेदवार आता आपले कॉल लेटर IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात.
अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड/जन्मतारीख वापरून लॉगिन करावे लागणार आहे. अॅडमिट कार्डमध्ये परीक्षेची तारीख, शिफ्टची वेळ, रिपोर्टिंग टाइम, परीक्षा केंद्राचा पत्ता तसेच परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचनांचा समावेश असतो. त्यामुळे उमेदवारांनी अॅडमिट कार्डवरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासणे अत्यंत आवश्यक आहे. IBPS RRB भरती 2025 अंतर्गत एकूण १३ हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये Office Assistant (Clerk), Officer Scale-I, Officer Scale-II आणि Officer Scale-III या पदांचा समावेश आहे. ऑफिस असिस्टंट (क्लार्क) पदांसाठी ८०२२ जागा, Officer Scale-I साठी ३९२८, Officer Scale-II साठी ११४२ तर Officer Scale-III साठी २०२ जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
वयोमर्यादेबाबत सांगायचे झाल्यास, वयाची गणना १ सप्टेंबर २०२५ या निर्णायक तारखेच्या आधारे करण्यात येणार आहे. Office Assistant पदासाठी १८ ते २८ वर्षे, Officer Scale-I साठी १८ ते ३० वर्षे, Officer Scale-II साठी २१ ते ३२ वर्षे आणि Officer Scale-III साठी २१ ते ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने Office Assistant आणि Officer Scale-I पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. Officer Scale-II पदांसाठी पदवीसोबत किमान २ वर्षांचा अनुभव, तर Officer Scale-III पदांसाठी १ ते ५ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा (Prelims/ Tier-I आणि Mains/ Tier-II), त्यानंतर ऑफिसर पदांसाठी मुलाखत, तसेच दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांचा समावेश आहे. Clerk पदांसाठी मुलाखत नसते. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर जाताना अॅडमिट कार्डची प्रिंट, एक वैध फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र इ.) आणि अॅडमिट कार्डवर नमूद केलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. IBPS RRB Admit Card 2025 जाहीर झाल्याने आता हजारो उमेदवारांच्या परीक्षेचा प्रत्यक्ष टप्पा सुरू झाला असून, उमेदवारांनी शेवटच्या क्षणी घाई न करता वेळेत अॅडमिट कार्ड डाउनलोड करून परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.