फोटो सौजन्य - Social Media
एग्जाम सिटी इंटिमेशन स्लिपमुळे उमेदवारांना परीक्षा केंद्राचे शहर आधीच कळते. त्यामुळे प्रवास, राहण्याची व्यवस्था आणि इतर नियोजन वेळेत करता येते. सिटी स्लिप डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांकडे अर्ज क्रमांक (Application Number) आणि जन्मतारीख असणे आवश्यक आहे. NTA कडून ही सुविधा उमेदवारांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सिटी स्लिप डाउनलोड करण्यासाठी खालील सोप्या टप्प्यांचे पालन करा:
अॅडमिट कार्ड मिळाल्यानंतर उमेदवारांनी त्यावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, अर्ज क्रमांक, प्रवर्ग (कॅटेगरी), विषय, परीक्षा शहर, फोटो आणि स्वाक्षरी यांचा समावेश आहे. कोणतीही चूक आढळल्यास तातडीने NTA किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
३१ डिसेंबरच्या परीक्षेबाबत महत्त्वाची सूचना
NTA ने स्पष्ट केले आहे की ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणारी UGC NET परीक्षा केवळ एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल. ही परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. त्या दिवशी कोणतीही दुसरी शिफ्ट असणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी वेळेचे योग्य नियोजन करून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






