career (फोटो सौजन्य : social media)
देशातल्या जवळपास १२६ शहरात या परीक्षेचं आयोजन करण्यात आल होत. देशातल्या २८ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी याच रजिस्ट्रेशन केल होते. मात्र मुंबईत घडलेल्या आगीमुळे अनेक विद्यार्थ्यांना याची परीक्षा देता आली नाही. त्या परीक्षेच्या आता पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्याच वेळापत्रक नुकताच जाहीर करण्यात आल आहे.
Abhishek Sharma चा गुरू Yuvraj Singh कडून बॅटिंग टिप्स, शिकण्यासाठी कुठे करता येईल अर्ज
ही परीक्षा २५ सप्टेंबरलाच आयोजित करण्यात आली होती. मात्र जे विद्यार्थी मुंबईत परीक्षा देवू शकले नाहीत त्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल. मुंबईत वगळता देशात सगळ्याच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली आहे . मात्र विद्यार्थ्यांच नुकसान होवू नये यासाठी आता परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात आली आहे.
१५ ऑक्टोबरला या परीक्षेच उत्तर सूची प्रसिद्ध होणार आहे. उत्तर सूची प्रसिद्ध झाल्यावर विद्यार्थ्यांना अंदाज येईल. विद्यार्थ्यांना SSC.Gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना माहिती घेता येईल .देशात १४ हजार ५२२ पदे ही भरली जाणार आहेत. विद्यार्थांना लवकरच याचा अंदाज येणार आहे.
देशभरात लाखो विद्यार्थी हे SSC परीक्षेची तयारी करत असतात . मात्र मुंबईमध्ये आगीच्या घटनेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. विद्यार्थ्यांना वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. मुंबई परीक्षा केंद्रावर ज्यांची परीक्षा राहिली आहे त्या विद्यार्थ्यांना ही संधी आता उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोणाला परीक्षा देता येईल?
देशात ही परीक्षा २६ सप्टेंबरलाच आयोजित करण्यात आली. जवळपास २८ लाख विद्यार्थ्यांच रेजिस्ट्रेशन परीक्षेसाठी झाल होत.मुंबईत आगीच्या घटनेमुळे काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित होते. मुंबईतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल.
सीईटी सेलने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची वाढवली मुदत
राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले पाहायला मिळाल. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे अशक्य होत. गेल्या आठ दिवसापासून पाऊस धो धो कोसळतय त्यामुळे घरातून बाहेर पडणे अशक्य होत आहे. राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालय जाणे शक्य नव्हत त्याची मुदत संपत आली होती. २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान प्रवेश घ्यायचा होता मात्र विद्यार्थ्यांना शक्य नव्हत म्हणून आता मुदत वाढ देण्यात आली आहे. ती वाढवून आता २ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आली आहे. संध्याकाळी ५.३० वाजे पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे.
परीक्षेशिवाय IT व्यक्तींची SBI मध्ये भरती, रू. 1.05 लाखापर्यंत मिळणार पगार; अर्जाची शेवटची तारीख जवळ