Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! जितेंद्र पापळकर यांचा इशारा

फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 13, 2026 | 03:43 PM
फोटो सौजन्य - Social Mediaफोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Mediaफोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्मविश्वासाने व प्रामाणिकपणे परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. कुठेही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

आता मिटेल बेरोजगारी? नोकरीच्या मोठमोठ्या संधी! देशभरात… रोजगाराची लाट; वाचा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देण्यासाठी विभागीय स्तरावर विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, १० फेब्रुवारी रोजी जैतापूर (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील केंद्रावर शिक्षक व पर्यवेक्षकांकडून कॉपी पुरविल्याचा प्रकार समोर आला. तसेच बीड तालुक्यातील चौसाळा येथे ड्रोनच्या साहाय्याने कॉपी पुरविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकारांमुळे परीक्षा प्रक्रियेतील काही गैरप्रकार अधोरेखित झाले आहेत.

या घटनांप्रकरणी जबाबदार शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येणार असून, आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई अहवाल सादर करावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.

परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना आढळलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील परीक्षेस अपात्र ठरविणे, गुन्हे नोंद करणे, निलंबन व चौकशी अशा कठोर कारवाया करण्यात येऊ शकतात. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित सर्व घटकांनी कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग अवलंबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Best Study Tips : CBSE तसेच ICSE, राज्य बोर्डाचा परीक्षेचा हंगाम सुरु! मुलांनी स्ट्रेस फ्री कसे राहावे?

जिल्हा प्रशासनाला सर्वोच्च सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Take the exam with confidence strict action will be taken if there is any misconduct commissioner jitendra papalkar warns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • HSC
  • SSC

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.