युवराज सिंग सेंटर ऑफ एक्सिलन्सचे शुल्क आणि अर्ज कसा करावा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतीय क्रिकेट संघाचा नवा स्टार अभिषेक शर्माने आशिया कप २०२५ मध्ये आपला नॉनस्टॉप खेळ सर्वांना दाखवला आणि T20 मध्ये दिमाखदार खेळ करत सर्वांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. हा तरुण फलंदाज त्याची शानदार खेळी असो किंवा मैदानावरील त्याची विजयी वृत्ती असो, दोन्ही गोष्टीमुळे चर्चेत आहे. अभिषेक शर्माने युवराज सिंगकडून क्रिकेट प्रशिक्षण घेतले. अनेकांना आता वाटत असेल की आपल्या मुलाला अभिषेक शर्मासारखे स्टार बनवावे आणि युवराज सिंहसारखा गुरू हवा असेल तर नक्की काय करावे?
जर तुम्ही नोएडामध्ये राहता आणि युवराज सिंगच्या अकादमीमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असाल तर फी आणि अर्ज कसा करायचा ते आपण आज या लेखातून जाणून घेऊया. युवराज सिंगची स्वतःची अकॅडमी असून त्यामध्ये अनेक मुलं प्रवेश घेतात. पण सामान्यांना हे परवडणारे आहे की नाही पाहूया.
पाचवी फेल पण घडवू शकतो इतिहास! वडिलांनी दिला उपदेश, आज आहे IAS
युवराज सिंग सेंटर ऑफ एक्सिलन्स
YSCE क्रिकेट अकादमी ही भारतातील सर्वोत्तम अकादमींपैकी एक आहे. नोएडा येथील सेक्टर १०० मध्ये स्थित ही अकादमी क्रिकेटपटूंना आरोग्य, फिटनेस, जीवनशैली आणि आहार याबद्दल शिकवते. YSCE त्यांना क्रिकेटचे बारकावे समजून घेण्यास आणि चांगल्या प्रकारे तयारी करण्यास मदत करण्यासाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा देखील प्रदान करते. याव्यतिरिक्त, तुम्ही BCCI-प्रमाणित प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देखील घेऊ शकता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कोचिंग कॅम्पस क्रिकेटपटूंना त्यांच्या क्रिकेट कोचिंग सत्रादरम्यान नवीन गोष्टी शिकण्याची मौल्यवान संधी प्रदान करतात.
YSCE साठी फी किती आहे?
युवराज सिंगची क्रिकेट अकादमी भारतातील विविध शहरांमध्ये आहे, ज्यात जालंधर, कोलकाता, अमृतसर, नोएडा, कपूरथला, फरीदाबाद, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम आणि अयोध्या यांचा समावेश आहे. प्रवेशासाठी एकवेळ नोंदणी शुल्क ₹७,००० आहे. मासिक शुल्क ₹५,००० प्रति महिना आहे. वेगवेगळ्या केंद्रांवर शुल्कात फरक असू शकतो. मात्र सामान्य घरातील व्यक्तीला विशेषतः मध्यमवर्गीयांनादेखील हे शुल्क परवडू शकते.
अर्ज कसा करावा?
YCSE साठी प्रवेश प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्ही प्रवेश फॉर्म ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, प्रथम YSCE च्या अधिकृत वेबसाइट, ysce.in ला भेट द्या आणि नंतर आमच्याशी संपर्क साधा पर्यायावर क्लिक करा. यानंतर, तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून प्रवेश प्रक्रि या पूर्ण करू शकता. ऑफलाइन प्रवेश मिळविण्यासाठी, तुमच्या जवळच्या YSCE केंद्राला भेट द्या आणि नोंदणी करा. यानंतर, मुलाची फिटनेस चाचणी आणि प्रारंभिक प्रशिक्षण घेतले जाईल आणि निवडलेल्या उमेदवारांना दैनंदिन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश दिला जाईल.
IOCL Engineer Recruitment 2025 : इंडियन ऑइलमध्ये अभियंता पदांची मोठी भरती! ताबडतोब करा अर्ज