Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LLB CET बाबत महत्वाची बातमी! प्रवेश नोंदणीस देण्यात आली मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एलएलबी (५ वर्षीय) प्रवेश नोंदणीस १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ही माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांनी दिली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 15, 2026 | 03:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एलएलबी (५ वर्षीय) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्यातर्फे देण्यात आली. कायद्याचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

सीईटी कक्षाच्या माहितीनुसार, आतापर्यंत एलएलबी (५ वर्षीय) अभ्यासक्रमासाठी २६,०६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी म्हणजे २०२५ मध्ये या प्रवेश परीक्षेसाठी ३५,०७४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामुळे यंदाही नोंदणीची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रवेश परीक्षा ८ मे रोजी होणार असून, विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित (Computer Based Test) पद्धतीने ऑनलाईन घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, नोंदणी वेळापत्रक तसेच इतर आवश्यक सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अद्ययावत माहिती आणि तपशीलवार वेळापत्रकासाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एलएलबी (५ वर्षीय) अभ्यासक्रम हा बारावीनंतर थेट कायद्याच्या शिक्षणात प्रवेश देणारा अभ्यासक्रम असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता आहे. कायदा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी ही मुदतवाढ लक्षात घेऊन वेळेत अर्ज सादर करावेत, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. या परीक्षेबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्प्यांसाठी विद्यार्थ्यांनी नियमित अद्ययावत माहिती तपासावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

Gondia Crime: 10 दिवसांच्या बाळाची विक्री, डॉक्टरचा टोकाचा निर्णय; गोंदिया प्रकरणाने राज्यात खळबळ

काय असते LLB CET टेस्ट?

एलएलबी सीईटी (LLB Common Entrance Test) ही कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाणारी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे. महाराष्ट्रात ही परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्यामार्फत आयोजित केली जाते. बारावीनंतर पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अनिवार्य असते. ही परीक्षा संगणकाधारित (Computer Based Test) पद्धतीने ऑनलाईन घेतली जाते. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी (Multiple Choice Questions – MCQ) स्वरूपाची असते. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले असतात आणि त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा असतो. साधारणतः परीक्षेचा कालावधी २ तासांचा असतो.

Web Title: Important news regarding llb cet admission registration has been extended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:31 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.