फोटो सौजन्य - Social Media
भारतात लहानपणी अनेकांना हा प्रश्न विचारला जातो की,” तू मोठा होऊन काय बनशील?’ तेव्हा त्या लहान मुलांच्या घोळक्यातील जास्त मुलांच्या ओंठावर तर डॉक्टर हेच लिहलेले असते. लहानपणी अनेकांना डॉक्टर होण्याची इच्छा असते. का नसावे? डॉक्टरी म्हणजे एक प्रकारे समाज सेवाच. तसेच डॉक्टर लोकं पैशांनीही मजबूत असतात. तर या पदाचा हेवा असणे तर सामान्य गोष्ट आहे. अनेकांना लहानपणी या पदाचा हेवा असतो. अनेकांना मोठे होऊन डॉक्टर होण्याची इच्छा असते. देशात अनेक तरुण या स्वप्नाच्या पूर्तीसाठी नीटची परीक्षा देतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येत उमेदवार या परीक्षेला उपस्थित राहतात. पण यातील नेमकेच जण या परीक्षेला उत्तीर्ण करतात आणि डॉक्टर बनण्याच्या प्रवासाला सुरुवात करतात.
भारतातील प्रत्त्येक राज्यामध्ये तरुण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रासाठी वेडे असतात. जसे महाराष्ट्रातील तरुण कला आणि क्रीडा क्षेत्राकडे जास्त आकर्षित आहेत. उत्तरेकडील तरुण स्पर्ध परीक्षांमध्ये जास्त उतरतात. गुजराती तरुण व्यवसाय आणि व्यापार क्षेत्रावर जास्त विश्वास ठेवतात. तसेच भारतात असा एक राज्य आहे, जेथील तरुण वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची आणि खासकरून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत असतात. मुळात, या राज्याला डॉक्टरांची फॅक्टरी म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात, ते राज्य कोणते?
भारतामध्ये सर्वाधिक एमबीबीएस प्रवेश कर्नाटकमध्ये घेतले जातात. याच कारणामुळे देशात सर्वाधिक युवक कर्नाटकमधून डॉक्टर बनून बाहेर पडतात. भारतामध्ये सर्वाधिक एमबीबीएस जागा कर्नाटकमध्ये आहेत. राज्यसभेत दिलेल्या आकड्यांनुसार, कर्नाटकमध्ये सुमारे ११,७४५ एमबीबीएस जागा आहेत, जे भारतातील इतर सर्व राज्यांपेक्षा जास्त आहेत. आणि याच कारणामुळे कर्नाटकमधून सर्वाधिक डॉक्टर बाहेर पडतात. कर्नाटक या राज्यानंतर तामिळनाडू या राज्याने दुसरे स्थान गाठले आहे. तर तिसऱ्या स्थानी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात MBBS साठी १०,८४५ जागा उपल्बध आहेत.
MBBS जागांच्या उप्लब्धतेनुसार भारतीय राज्यांची क्रमवारी
एमबीबीएस सीट्सच्या बाबतीत कर्नाटक पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर तमिळनाडू आणि महाराष्ट्र आहेत. चौथ्या स्थानावर उत्तर प्रदेश आहे, जिथे ९९०३ एमबीबीएस सीट्स आहेत. पाचव्या स्थानावर तेलंगाना आहे, जिथे ८४९० एमबीबीएस सीट्स आहेत. सहाव्या स्थानावर गुजरात आहे, जिथे ७१५० एमबीबीएस सीट्स आहेत. सातव्या स्थानावर आंध्रप्रदेश आहे, जिथे ६४८५ एमबीबीएस सीट्स आहेत. आठव्या स्थानावर राजस्थान आहे, जिथे ५५७५ एमबीबीएस सीट्स आहेत. नवव्या स्थानावर मध्य प्रदेश आहे, जिथे ४८०० एमबीबीएस सीट्स आहेत. दहाव्या स्थानावर बिहार आहे, जिथे २७६५ एमबीबीएस सीट्स आहेत.