Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Education : गुरुकुल पद्धत ते हॉस्टेल; शिक्षण संस्थेचा बदलत जाणारा प्रवास

गुरुकुल पद्धतीपासून आजच्या आधुनिक हॉस्टेल-आधारित शिक्षणसंस्थांपर्यंतचा हा प्रवास म्हणजेच भारतातील शिक्षण व्यवस्थेचा विकासाचा प्रवास अखंडित आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 03, 2025 | 04:59 PM
Indian Education : गुरुकुल पद्धत ते हॉस्टेल; शिक्षण संस्थेचा बदलत जाणारा प्रवास
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय संस्कृतीत शिक्षणाला मोठं महत्व आहे. शिक्षण कार्याइतकं पवित्र कार्य नाही असं म्हटलं जातं. गुरु शिष्याचं नातं आणि आयुष्यात गुरुचं एक मोठं स्थान आहे, पुरातन काळापासून सांगण्यात आलेलं आहे. फार पुर्वी गुरुकुल पद्धतीला सुरुवात झाली. गुरुकुल पद्धत ते हॉस्टेल सिस्टिम काळानुसार सगळंच बदलत गेलं.भारतीय शिक्षणपद्धतीचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि समृद्ध आहे. काळानुसार समाज, तंत्रज्ञान आणि जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे शिक्षणाच्या पद्धतीतही मोठे परिवर्तन झाले आहे. गुरुकुल पद्धतीपासून आजच्या आधुनिक हॉस्टेल-आधारित शिक्षणसंस्थांपर्यंतचा हा प्रवास म्हणजेच भारतातील शिक्षण व्यवस्थेचा विकासाचा प्रवास अखंडित आहे.

गुरुकुल पद्धत – ज्ञानाची मूळ परंपरा

प्राचीन भारतात शिक्षण गुरुकुल पद्धतीत दिले जात होते. विद्यार्थी गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असत. येथे शिक्षण म्हणजे फक्त अक्षरज्ञान नव्हे, तर व्यक्तिमत्त्व घडवणे, शिस्त, संस्कार, आत्मसंयम आणि समाजसेवा शिकवणे हा त्याचा उद्देश होता. गुरुकुलात विद्यार्थ्यांना वेद, उपनिषद, गणित, खगोलशास्त्र, युद्धकला, औषधविद्या इत्यादी विषय शिकवले जात. शिक्षण विनामूल्य असे, आणि गुरू-शिष्याच्या नात्याला भावनिक बाजू होती.

दहावीत नापास पण पठ्ठ्यानं MPSC मध्ये मारली बाजी; राज्यात अव्वल आलेल्या आदिवासी तरुणाची कहाणी

काळ बदलला तसं देशात परकिय सत्ता वाढू लागल्या. इंग्रजांनी तब्बल दिडशे वर्ष राज्य केलं. या काळात त्यांनी शिक्षण पद्धतीत देखील मोठे बदल केले.
इंग्रजी माध्यम, शाळा-कॉलेजांची संकल्पना आणि पाठांतरावर आधारित अभ्यासक्रम यांचा प्रसार झाला. या काळात शिक्षण अधिक औपचारिक, प्रमाणपत्राधारित झाले आणि रोजगाराच्या संधींशी जोडले गेले.

स्वातंत्र्योत्तर काळातील आधुनिकता

स्वातंत्र्यानंतर भारतात शासकीय आणि खासगी शिक्षणसंस्था मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या. ग्रामीण भागात शाळांचे जाळे विस्तारले, तर शहरी भागात विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी अशा क्षेत्रांत उच्च शिक्षणसंस्था निर्माण झाल्या.

हॉस्टेल संस्कृती

आधुनिक शिक्षणसंस्थांमध्ये हॉस्टेल संस्कृतीचा उदय झाला. विद्यार्थी घरापासून दूर राहून स्वावलंबन, वेळेचे व्यवस्थापन, समाजशीलता आणि जबाबदारी शिकतात. हॉस्टेल जीवन हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून, ते व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम बनले आहे. काळ बदलत गेला पण शिक्षण कार्य थांबलेलं नाही की थांबणार नाही. सध्याच्या डिजीटल युगामुळे कुठेही बसून हवं ते शिकता येतं फक्त शिकण्याची तयारी हवी. सातासमुद्रापार असेलेल्या शिक्षकांना देखील विविध अ‍ॅप्सच्य़ा माध्यमातून शिक्षणाची देवाणघेवाण करता येतेय, याची जाणीव झाली ती कोरोना काळात. जेव्हा प्रवास करणं ठप्प झालं तेव्हा मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी आधुनिका डिजीटल शिक्षणाचा पर्याय निवडला गेला.

ICAI CA September 2025 Result LIVE: तयार ठेवा रोल नंबर, काही तासातच येणार CA निकाल, ‘इथे’ पहा अपडेट

 

Web Title: Indian education from gurukul system to hostel the changing journey of an educational institution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • Education Department
  • Education News in Marathi

संबंधित बातम्या

दहावीत नापास पण पठ्ठ्यानं MPSC मध्ये मारली बाजी; राज्यात अव्वल आलेल्या आदिवासी तरुणाची कहाणी
1

दहावीत नापास पण पठ्ठ्यानं MPSC मध्ये मारली बाजी; राज्यात अव्वल आलेल्या आदिवासी तरुणाची कहाणी

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2026 : दहावी – बारावीचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार परीक्षा
2

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2026 : दहावी – बारावीचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार परीक्षा

कोणी विद्यार्थी देता का विद्यार्थी! तब्बल 8 हजार सरकारी शाळा पडल्यात ओसाड, शिक्षक घेतायेत फुकट पगार
3

कोणी विद्यार्थी देता का विद्यार्थी! तब्बल 8 हजार सरकारी शाळा पडल्यात ओसाड, शिक्षक घेतायेत फुकट पगार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.