Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती प्रक्रियेला सुरुवात; पदवीधरांना करता येईल अर्ज

इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये अप्रेंटिस स्टाफच्या ५५० रिक्त जागांना भरण्यासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. २८ ऑगस्टपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली असून सप्टेंबरच्या १० तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 29, 2024 | 03:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बँकिंग क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इच्छेची पूर्तता लवकरच करता येणार आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेत अप्रेंटिस स्टाफची भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी काम करू इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे निर्देश इंडिअन ओव्हरसीज बँकेने दिले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत २८ ऑगस्टला सुरु झाली असून बऱ्यापैकी उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे उमेदवारांना १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या iob.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

हे देखील वाचा : मजुरांचे मनरेगा कार्ड होणार रद्द? ‘या’ लोकांना कार्डद्वारे काम मिळणे बंद

इंडियन ओव्हरसीज बँकेने अप्रेंटिस स्टाफच्या एकूण ५५० जागांसाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना इंडियन ओव्हरसीज बँकेने जाहीर केलेल्या काही अटी शर्तींना पात्र असणे अनिवार्य आहे. मुळात या अटी शर्ती शिक्षण तसेच वयोमर्यादे विषयक आहेत. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. त्याचबरोबर पदवीच्या शिक्षणाच्या स्ट्रीमबद्दल अशी काही ठराविक माहिती नमूद नसल्याने उमेदवार कोणत्याही स्ट्रीममधून पदवीधर असणे चालणार आहे. अधिसूचनेत वयोमर्यादे विषयक काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आहे तर कमाल वय २८ वर्षे आहे. एकंदरीत, इंडियन ओव्हरसीज बँकेने या भरती प्रक्रियेत तरुणाईवर लक्ष दिले आहे. २० वर्षे ते २८ वर्षे वय असणारे उमेदवार या भरती प्रकियेत सहभाग घेऊ शकतात आणि अर्ज करण्यास पात्र आहेत.

अर्ज करताना उमेदवारांना काही रक्कमेची अर्जशुल्क म्हणून भुगतान करावे लागणार आहे. जनरल, ओबीसी तसेच EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ९४४ रुपये भरावे लागणार आहे. तर एससी/एसटी प्रवगातील उमेदवारांना ७०८ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तेच अर्ज शुल्काची रक्कम दिव्यांग उमेदवारांसाठी ४७२ रुपये इतकी आहे.

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने iob.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • Latest Recruitments या ऑप्शनवर क्लिक करा.
  • पुढील पेज उघडल्यावर Engagement of Apprentices under Apprentices Act या लिंक वर जा.
  • आता Apply Online वर क्लीक करा.
  • आवश्यक ती माहिती भरून घ्या आणि सबमिट करा.
  • रजिस्ट्रेशन झाल्यावर फॉर्म भरून घ्या.
  • फॉर्म सबमिट झाल्यावर ते डाउनलोड करा. त्याची एखादी प्रत स्वतःकडे ठेवा.

Web Title: Indian overseas bank recruitment process begins graduates can apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 03:41 PM

Topics:  

  • government jobs

संबंधित बातम्या

Govt Jobs: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी नोकरीची संधी! आयटीआय उत्तीर्ण ते इंजिनिअर्स पदांसाठी भरती सुरू; पाहा पात्रता
1

Govt Jobs: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी नोकरीची संधी! आयटीआय उत्तीर्ण ते इंजिनिअर्स पदांसाठी भरती सुरू; पाहा पात्रता

ONGC Recruitment 2026: ओएनजीसीमध्ये इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी! दरमहा मिळणार ७० हजारांपेक्षा जास्त पगार
2

ONGC Recruitment 2026: ओएनजीसीमध्ये इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी! दरमहा मिळणार ७० हजारांपेक्षा जास्त पगार

Indian Army Women Recruitment 2026: महिला इंजिनिअर्ससाठी लष्कराची मोठी भरती; जाणून घ्या अर्ज कसा करावा?
3

Indian Army Women Recruitment 2026: महिला इंजिनिअर्ससाठी लष्कराची मोठी भरती; जाणून घ्या अर्ज कसा करावा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.