फोटो सौजन्य - Social Media
भारत डायनॅमिक लिमिटेडमध्ये रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. apprenticeshipindia.gov.in या अधीकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्यावा. शंभरहून अधिक रिक्त पदांसाठी हे भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. एकंदरीत या भरतीच्या माध्यमातून 100 हून अधिक उमेदवारांना अप्रेंटिसशिप देण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : चित्रकलेची आवड आहे, पण करिअर कसे करतात? हे ठाऊक नाही; नक्की वाचा
त्या रिक्त जागांमध्ये 35 पदे फिटरची आहेत. 22 पदे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकची आहेत. 8 पदे मशिनिस्ट तर 5 पदे वेल्डरची आहेत. तसेच मेकॅनिक डीजे पदासाठी 2 रिक्त जागा आहेत. इलेक्ट्रिशियनच्या पदासाठी 7, टर्नरच्या पदासाठी 8, प्लंबर आणि सुतारच्या पदासाठी प्रत्येकी 1 रिक्त जागा, R&AC तसेच LACP च्या पदासाठी प्रत्येकी 1 तर कोपाच्या पदासाठी 20 अशा एकूण 117 जागा या भरतीच्या माध्यमातून भरक्या जाणार आहेत.
भारत डायनॅमिक लिमिटेडच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. एकंदरीत, दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवार भरतीसाठी अर्ज करून शकतात. तसेच उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रामध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. फक्त शैक्षणिकच नव्हे तर वयोग मर्यादा विषयक अट त्या अधिसूचनेत जाहीर करण्यात आली आहे. एका ठराविक वयोगटातील उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात. किमान 14 वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तर जास्तीत जास्त 30 वर्ष आयु असलेले उमेदवार भर्तीसाठी पात्र आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आरक्षण प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना पाच वर्ष अधिक वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. तर ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक तीन वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे देखील वाचा : स्टार्ट अप सुरु करण्याचा विचार करताय? ‘हे’ व्यवसाय मिळवून देतील उत्तम नफा
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जा. BDL Recruitment 2024 या लिंकवर क्लिक करा. स्क्रीनवर आलेला फॉर्म भरा. आवश्यक ती माहिती तसेच आवश्यक ते दस्तएवजांच्या पुष्टिने फॉर्म भरून घ्या. त्याला सबमिट करा व भविष्यात उद्भवणाऱ्या गरजेसाठी फॉर्मची एखादी प्रत स्वतःकडे काढून घ्या.