फोटो सौजन्य - Social Media
अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना लहानपणापासून मनात कलेसाठी ओढ निर्माण केली जाते. वयाप्रमाणे हे कलेचे बीज जोपासले गेले तर त्याचे वृक्ष होण्यास तयार होते. या वृक्षाला योग्य दिशा देणे फार महत्वाचे असते. अन्यथा ती कला आतल्या आत राहते आणि त्याचा काहीच फायदा होत नाही. जर तुम्हाला किंवा तुमच्या पाल्याला चित्रकलेची आवड आहे, तर नक्कीच हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. या लेखावर घालवलेला वेळ नक्कीच तुमच्या उपयोगी येणार आहे. चित्रकलेची आवड असणाऱ्या मुलांसाठी अनेक करिअर पर्याय आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात, त्या माध्यमांबद्दल.
हे देखील वाचा : एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2025: ‘या’ तारखेंदरम्यान करता येणार अर्जात सुधार
सर्वप्रथम जाणून घेऊयात. चित्रकला अवगत असणारे विद्यार्थी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअर घडवू शकतात? सर्वप्रथम चित्रकाराला स्वतंत्र्य राहून काम करता येऊ शकते. आपल्या चित्रांचे प्रदर्शन घडवून पैसे कमवता येऊ शकते. तसेच नावही कमावता येऊ शकते. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन चित्रकारांना यश मिळवता येते आणि प्रसिद्धी मिळवता येते. चित्रकारांसाठी दुसरा करिअर पर्याय म्हणजे ग्राफिक डिझायनर. चित्रकारांना आपल्या क्रिएटिव्ह मेंदूच्या जोरावर विविध कंपन्यांसाठी काम करता येते. विविध कंपन्यांसाठी लोगो, पोस्टर्स, जाहिराती यासारखे डिझाइन तयार करण्याचे काम करता येते. आजच्या काळात सर्वीकडे जाहिराती असो वा चित्रपट. तसेच गेमिंग क्षेत्रही फार जलद गतीने वाढत आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये अनिमेशनचा वापर वाढत आहे. चित्रकार 2D तसेच 3D अनिमेशन शिकून घेत, आपल्या करिअरलळा तेजी देऊ शकतात. तसेच अनिमेशन बनवणे इतर इच्छुक मुलांना शिकवू शकतात.
अनेक शाळांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये चित्रकला विषयांसाठी शिक्षकांची गरज असते. तर अनेक चित्रकारांना प्राध्यापक पदासाठी संधी दिली जाते, जेथे ते विद्यार्थ्यांना चित्रकलेचे प्रशिक्षण देत असतात. जर चित्रकारांना या क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करायचे आहे तर हा पर्याय उत्तम आहे. तसेच गॅलरी, संग्रहालय व्यवस्थापन तसेच कला प्रदर्शनाचे आयोजन आणि कला संग्रहण यामध्ये चित्रकारांना अफाट संधी आहेत.
हे देखील वाचा : आधारचा बेरोजगारांना आधार; राज्याबाहेर नोकरी करू शकणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
प्रत्येक चित्रकाराने त्यांचा पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे. यामध्ये त्यांनी त्यांच्या कलाकृतींचे संग्रह केले पाहिजे. सर्व पेंटीग्स तसेच उत्तम स्केटचेसचा साठा ठेवला पाहिजे. याचा वापर भविष्यामध्ये होत असतो. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. आताच्या काळामध्ये सोशल मीडियावर आपले हॅन्डल खोलून तेथे आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन करू शकतो. सोशल मीडियाचा वापर करून आपल्या कला प्रदर्शित करणे फायदेशीर ठरू शकते. एकंदरीत, चित्रकलेत करिअर करताना सातत्य, सर्जनशीलता, आणि मेहनत हे महत्त्वाचे घटक आहेत. योग्य दिशा, सराव, आणि आत्मविश्वास असला की चित्रकलेत नक्कीच यश मिळवता येते.