फोटो सौजन्य - Social Media
आपण अशा अनेक गोष्टी ऐकल्या किंवा वाचल्या असतील, ज्यामध्ये UPSC पात्र करणाऱ्या उमेदवारांची यशोगाथा सांंगण्यात आली आहे. पण या कथेमध्ये, बहुतेक अधिकारी हे पूर्णपणे त्यांच्या तयारीशी जोडल्या असतात. पण असेही काही अधिकारी आहेत, जे त्यांचे सोशल लाईफ सांभाळता, देशातील ही सर्वात कठीण परीक्षा पात्र करतात, ते ही कोणत्या महागड्या कोचिंगचा आधार न घेता.
अंशिका वर्मा सोशल मीडियावर प्रसिद्ध अशी Influencer आहे आणि त्यापेक्षा मोठी बाब म्हणजे ती एक IPS अधिकारी आहे. सोशल मीडियावर बरेच नेटकरी तिचे चाहतेमंडळी आहेत. अंशिका आधी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये शिक्षण घेत होती. दिल्लीच्या गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून तिने B.Tech (Electronics & Communication) ही पदवी मिळवली. अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेत असताना, तिला देशासाठी काही तरी करण्याची इच्छा होती. अखेर, तिने UPSC सारखी कठीण परीक्षा पात्र करण्याची ठरवली.
या दरम्यान तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. कारण अंशिका स्वतःहून अभ्यास करत होती. तिने कोणत्याही महागड्या शिकवण्याचा आधार घेतला नाही. स्वतः अभ्यास केला आणि पहिल्या प्रयत्नात तिच्या हाती अपयश आले पण तिने त्यावर हार मानली नाही. तिने दुसरे प्रयत्न करण्याचे ठरवले आणि २०२० साली केलेले हे प्रयत्न सार्थकी ठरले. अंशिकाने १३६ वी रँक मिळवली आणि तिची नेमणूक IPS अधिकारी म्हणून झाली.
अंशिका सध्या गोरखपूरमध्ये ASP (Assistant Superintendent of Police) पदावर कार्यरत आहे. अंशिका IPS अधिकारीसह एक सोशल मीडिया स्टार आहे. अंशिकाचे एकूण 541K ( ५,४१,००० ) फॉलोवर्स आहेत. ती नेहमी तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. तिची भली मोठी चाहते मंडळी आहे. नवीन पोस्टच्या माध्यमातून तसेच रील्सच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडलेली असते.
आंशिक दिसण्यात फार आकर्षक आहे. त्यामुळे तिला ‘Beauty with Brain’ असे ही म्हंटले जाते. त्यांच्या स्मार्टनेस, दमदार पर्सनालिटी आणि कामावरील निष्ठेमुळे त्या लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.