फोटो सौजन्य - Social Media
श्रीकांत जिचकार हे नाव अनेकांनी ऐकलेच असेल. श्रीकांत ओळखले जातात ते त्यांच्या शिक्षणामुळे… श्रीकांत यांनी त्यांच्या आयुष्यात २० पदव्या मिळवल्या आहेत. ते देशातील सर्वात शिक्षित व्यक्त्तमत्व आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ४२ विद्यापीठांमध्ये परीक्षा दिल्या आहेत. विविध क्षेत्र जसे की अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, सामान्य प्रशासन, इंग्रजी साहित्य, समाजशास्त्र तसेच राज्यशास्त्र आणखीन अनेक विविध विषयात अभ्यास करून पदवी प्राप्त केली आहे. त्यातील काही विषयांमध्ये ते डॉक्टरेट आहेत.
१९५४ मध्ये महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून शिक्षण घेण्यास सुरुवात केलेला हा शिक्षणप्रेमी कधी थांबलाच नाही. इतके शिक्षण घेतले की देशातील सर्वात जास्त शिक्षित माणूस झाला. MD तसेच MBBS होऊन, डॉक्टर साहेबांनी १९७८ मध्ये देशाची सर्वात कठीण परीक्षा UPSC पात्र केली. २ वर्षांनी १९८० रोजी, पुन्हा UPSC पात्र करत श्रीकांत IAS अधिकारी झाले. नागरी सेवा अधिकारी म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली, पण ते येथेच विराम घेत स्थिरावले नाही. त्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी राजकारणात उडी घेतली. वयाच्या अगदी २६ साली, ते आमदार बनले. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्री पदाची धुरा सांभाळली. एक नव्हे तर १४ विभागांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती.
१९९२ मध्ये, श्रीकांत यांची नेमणूक लोकसभेत खासदार म्ह्णून करण्यात आली. वाईट गोष्ट अशी की वयाच्या केवळ ४९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. २ जून २००४ मध्ये नागपूरपासून फक्त ४० किमी अंतरावर असणाऱ्या कोंढाळीजवळ त्यांचे अपघात झाले. ४२ विद्यापीठांमध्ये घेतलेले शिक्षण, २० पदव्या, आयुष्यभर शिक्षणात घालवलेला प्रत्येक दिवस या दिवशी माळवला. पण त्यांनी त्यांचा शैक्षणिक वारसा तसेच नागरी सेवेचा वारसा मागे सोडला. आजही अनेक राजकीय नेतेमंडळी तसेच नागरी सेवेतील अधिकारी श्रीकांत जिचकार यांच्या मार्गावर चालतात. त्यांचे आदर्श घेतात.