Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT दिल्लीमध्ये भरती! अगदी पन्नाशी गाठलेले उमेदवारही करू शकतात अर्ज, मग कसली बघताय वाट?

Indian Institute of Technology Delhi मध्ये 2026 साठी नॉन-टीचिंग पदांवर भरती जाहीर झाली असून 08 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 18, 2026 | 07:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Indian Institute of Technology Delhi (IIT Delhi) ने 2026 साठी नॉन-टीचिंग पदांवर भरती जाहीर केली असून, दिल्लीमध्ये चांगली नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. विशेष म्हणजे 45 ते 55 वयोगटातील उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी 08 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेत चीफ सिक्युरिटी ऑफिसर, मेडिकल ऑफिसर, करिअर काउन्सलर, सुपरिटेंडेंट इंजिनियर यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. ही भरती सिक्युरिटी, हॉस्पिटल, करिअर सर्विस तसेच स्टेट अँड वर्क्स कॅडर या विभागांसाठी करण्यात येत आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी ही उत्तम संधी ठरू शकते.

भूगाेल पेपर चाेरीला; बुधवारचा पेपर नियाेजित वेळेत हाेणार, SSC बोर्डाचा मोठा निर्णय

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

चीफ सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समधील कमीशंड ऑफिसर किंवा पोलीस उपअधीक्षक स्तरावरील अधिकारी असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 55 टक्के गुणांसह पदवी आणि 15 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्यामध्ये वरिष्ठ स्तरावरील कामाचा अनुभवही अपेक्षित आहे. मेडिकल ऑफिसर (सायकेट्रिस्ट) पदासाठी MBBS पदवी आणि इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. तसेच मान्यताप्राप्त रुग्णालयात किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

करिअर काउन्सलर पदासाठी सायकोलॉजी, सोशल वर्क किंवा संबंधित विषयात किमान 55 टक्के गुणांसह मास्टर्स पदवी आणि 7 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. विशेषतः सायकोमेट्रिक टेस्टिंग आणि करिअर मार्गदर्शनाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. सुपरिटेंडेंट इंजिनियर पदासाठी इंजिनियरिंग किंवा टेक्नोलॉजीमध्ये मास्टर्स पदवी (किमान 55 टक्के गुण) आवश्यक आहे. पर्यायी म्हणून बॅचलर पदवीसह दीर्घकालीन अनुभव असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

अर्ज प्रक्रिया कशी कराल?

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी NIELIT च्या अधिकृत रिक्रूटमेंट पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.
  • ‘Register’ लिंकवर क्लिक करून प्राथमिक माहिती भरावी
  • लॉगइन करून संपूर्ण अर्ज फॉर्म भरावा
  • आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करावी
  • अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा
  • भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट काढून ठेवावा
सरकारी, निमसरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या उमेदवारांनी अर्जाची हार्ड कॉपी आवश्यक कागदपत्रांसह IIT दिल्लीला स्पीड पोस्टद्वारे पाठवणे बंधनकारक आहे.

अर्ज शुल्क

  • जनरल / EWS / OBC : ₹1500
  • SC / ST / महिला / PwBD / Ex-Servicemen : ₹750
निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाईल.

  • टियर I : लेखी परीक्षा
  • टियर II : प्रेझेंटेशन
  • टियर III : इंटरव्ह्यू

दहावीच्या प्रश्नपत्रिकेची चोरी! केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी निलंबित : पेपर नियोजित वेळेत

यानंतर कागदपत्रांची पडताळणी (Document Verification) केली जाईल.

ही भरती विशेषतः अनुभवी उमेदवारांसाठी एक उत्कृष्ट संधी आहे. प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

Web Title: Iti delhi recruitment different kind of posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Bombay IIT
  • IIT

संबंधित बातम्या

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!
1

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
2

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.