Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ITI विद्यार्थ्यांना राहत्या जिल्ह्यात मिळणार अप्रेंटिसशिप; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

आता आयटीआय विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या जिल्ह्यातील स्थानिक उद्योगांमध्येच अँप्रेंटिसशिप मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विद्यावेतनासह प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 11, 2025 | 08:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (ITI) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आदेश दिले आहेत की आयटीआय विद्यार्थ्यांना आता त्यांच्या राहत्या जिल्ह्यातील स्थानिक उद्योगांमध्येच शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) मिळावी. यामुळे हजारो प्रशिक्षणार्थींना घराजवळच अँप्रेंटिसशिपसाठी संधी उपलब्ध होणार आहे.

NICL ने सुरु केली भरती; AO पदांसाठी करता येणार अर्ज

राज्य शासन ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना’ राबवत असून यामध्ये दरवर्षी एक लाख उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असून ३० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये एकूण मनुष्यबळाच्या किमान २.५% ते कमाल २५% जागा शिकाऊ उमेदवारांसाठी राखीव ठेवाव्या लागणार आहेत.

सध्या राज्यात २७ गटातील २५८ निर्देशित व्यवसाय, ३५ क्षेत्रांतील ४१४ वैकल्पिक तंत्रज्ञ, तसेच १२३ इतर व्यवसाय यामध्ये अँप्रेंटिसशिप उपलब्ध आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी व्यवसायानुसार ६ ते ३६ महिन्यांचा असतो. या योजनेंतर्गत प्रशिक्षित तसेच अप्रशिक्षित उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाते. स्थानिक उद्योगांमध्येच अँप्रेंटिसशिप मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.

शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रातील आस्थापनांमध्येही ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमांचाही आढावा घेऊन त्या त्या ट्रेड्स या योजनेंतर्गत समाविष्ट केल्या जात आहेत. तसेच प्रशिक्षण संस्थांना शासनातर्फे आवश्यक ती आर्थिक मदतही दिली जात आहे.

परदेशात नोकरी करण्याची इच्छा आहे? ‘ही’ कौशल्य करा आत्मसात; येतील कॉलवर कॉल

विशेष म्हणजे, पूर्वी बृहन्मुंबई महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील २०० विद्यार्थ्यांना अँप्रेंटिसशिप मिळत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ती प्रक्रिया थांबली होती. आता मंत्री लोढा यांनी पुन्हा ती प्रक्रिया सुरु करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र दिले असून, लवकरच इतर महापालिकांमधूनही विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपची संधी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Iti students will get apprenticeship in their residential district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 08:57 PM

Topics:  

  • education news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.