फोटो सौजन्य - Social Media
परदेशामध्ये जाऊन काम करणे असे स्वप्न अनेक जण घेऊन असतात. पण प्रत्येकजण या ध्येयाला सध्या करण्यात सक्षम ठरत नाही. कारण त्यासाठी काही कलागुण आणि अंगात कौशल्य असणे गरजेचे असते. ती कौशल्य कोणती? ती कलागुण कोणते? ज्यांना आत्मसात केल्याने आंतरराष्ट्रीय नोकरी मिळवणे सोपे होते. तर चला मग जाणून घेऊयात.
आपले ध्येय निश्चित असणे फार आवश्यक आहे. आपल्याला करायचं काय आहे? कोणत्या देशात नोकरी मिळवायची आहे? अशा अनेक प्रश्नांचे उत्तरं आपल्याकडे असणे आवश्यक आहे. ध्येय असले तर मार्गाची निवड करणे सोपे होऊन जाईल. त्यामुळे एक प्लांनिंग आणि ध्येय असणे आवश्यक आहे. ज्या देशामध्ये तुम्हाला जायचे आहे, तेथील भाषा आणि संस्कृतीचा ज्ञान असणे आवश्यक आहे. आदर असणे आवश्यक आहे. तेथील लोकांना जपता आले पाहिजे. महत्वाचे म्हणजे कौशल्य अंगीकृत करा. बाहेरच्या कंपन्या Qaulity कौशल्य असणाऱ्या उमेदवारांनाच नियुक्त करतात. जर तुम्हाला त्या कंपनायामध्ये काम करण्याची इच्छा असेल तर त्यानुसार स्वतःवर काम करणे गरजेचे आहे, आपल्या अंगी कौशल्य निर्माण करणे फार गरजेचे आहे.
प्रत्येक उमेदवाराकडे Linkdin तसेच Indeed सारख्या साईटवर ID असणे आवश्यक आहे. तसेच वेळोवेळी तेथील Profile अपडेट करणे आवश्यक आहे. मुळात, ज्या देशात जायचे आहे, त्यानुसार आपले प्रोफाइल असणे आवश्यक आहे. अशा वेळी ओळख फार कामी येते. बाहेरगावी काम करणाऱ्या उमेदवारांच्या ओळखीत राहा. त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी शिकून तसेच जाणून घ्या.
प्रत्येक देशामध्ये VIsa रुल्स वेगवेगळे आहेत. त्यानुसार तयारी करून घ्या, तसेच ऑनलाईन स्वरूपात होणाऱ्या मुलाखतीचा सराव करत चला. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आणि लक्षात घेऊन, तुम्ही तुमच्या परदेशी नोकरीचे स्वप्न पूर्णत्वास आणू शकता.