Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pilot Recruitment 2026: जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीमध्ये पायलट पदांची भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर

JNPA Pilot Recruitment 2026: जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीच्या सागरी विभागात करार पद्धतीवर पायलट पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 09, 2026 | 11:28 AM
pilot

pilot

Follow Us
Follow Us:

JNPA Pilot Recruitment 2026: जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) च्या सागरी विभागातर्फे करार पद्धतीवर ‘पायलट’ (Pilot) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती योजना-१ आणि योजना-२ अंतर्गत केली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे फॉरेन गोइंग जहाजांवर चीफ ऑफिसर किंवा त्याहून वरच्या पदाचा किमान एक वर्षाचा अनुभवासह मास्टर कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. भारतीय नागरिकांकडे परदेशी कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र असल्यास, त्यांच्याकडे डीजी शिपिंगची संबंधित मान्यता असणे गरजेचे आहे. तसेच पायलट सेवा प्रवेशाच्या वेळी उमेदवाराचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. शासकीय किंवा निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या उमेदवारांना योग्य त्या माध्यमातून अर्ज करावा लागेल.

विद्यार्थ्यांच्या रोषाची धग वाढली! MPSC च्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर

अर्ज प्रक्रिया आणि मुलाखत

उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह (शैक्षणिक पात्रता, कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र, सीडीसी आणि जात प्रमाणपत्र) स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टद्वारे पाठवावेत किंवा harbourmaster@jnport.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. अर्जासोबत जातीचा दाखला आणि इतर प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे. मुलाखतीची तारीख ७ दिवस आधी कळवली जाईल, आणि मुलाखत प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने डेप्युटी कन्झर्व्हेटर कार्यालय, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी, प्रशासन इमारत, नवी शेवा, नवी मुंबई येथे होईल.

Ragging Case: हिमाचल प्रदेशातील नामांकित शाळेत नववीच्या विद्यार्थ्याला मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

मानधन आणि सविस्तर माहिती

योजना-१ आणि योजना-२ अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या टनेज स्लॅबनुसार आकर्षक वेतन आणि भत्ते दिले जाणार आहेत. सुरुवातीला उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेतले जाईल. या भरतीबाबतची सविस्तर माहिती, अर्जाचा नमुद आणि इतर अटी JNPA च्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील.

Web Title: Jnpa pilot recruitment 2026 marine department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • High salary Job
  • Interview for Jobs
  • Jobs Recruitment
  • Loco Pilot

संबंधित बातम्या

MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची संधी; MPSC तर्फे ‘या’ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू
1

MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र शासनात अधिकारी होण्याची संधी; MPSC तर्फे ‘या’ रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू

Bank of Baroda Recruitment 2026: सरकारी बँकिंग नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामार्फत १,१०० जागांसाठी भरती जाहीर
2

Bank of Baroda Recruitment 2026: सरकारी बँकिंग नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामार्फत १,१०० जागांसाठी भरती जाहीर

Banking Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सप्टेंबर महिन्यात तब्बल १८,१०४ पदांसाठी भरती जाहीर!
3

Banking Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सप्टेंबर महिन्यात तब्बल १८,१०४ पदांसाठी भरती जाहीर!

Engineering recruitment 2026 : संरक्षण मंत्रालयांतर्गत नोकरीची संधी! प्रकल्प अभियंता पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा!
4

Engineering recruitment 2026 : संरक्षण मंत्रालयांतर्गत नोकरीची संधी! प्रकल्प अभियंता पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.