फोटो सौजन्य - Social Media
भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) मध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. ट्रेनी ऑफिसर, ट्रेनी असिस्टंट आणि ट्रेनी इंजिनिअर पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना bdl.india.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज १० ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. २१२ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
विविध विभागांमध्ये ही भरती आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना काही शैक्षणिक निकषांना पात्र करत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच काही वयोमर्यादा संबंधित निकषांना पात्र करावे लागणार आहे. ट्रेनी इंजीनियर पदासाठी BE/B.Tech शिक्षण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. ट्रेनी डिप्लोमा असिस्टेंट पदासाठी तांत्रिकी क्षेत्रात डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
वयोमर्यादेसंबंधित अटी लक्षात घेतले की जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीतही अर्ज करू शकतात. काही सामाजिक आरक्षित घटकांना आयुमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे. किती? ते जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचा. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरायचे आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्ह्णून ३०० रुपये भरायचे आहे. EWS आणि OBC -NCL मधून येणाऱ्या उमेदवारांनाही सारखीच रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरायचे आहे.
इतर घटकांना अर्ज शुल्क माफ आहे. अशा प्रकारे करता येईल अर्ज: