Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Board Exam 2027: सरकारच्या विद्यार्थ्यांना दिलासा! इयत्ता १०वी-१२वीचे परीक्षा शुल्क माफ होणार

Maharashtra Board Exam 2027: राज्य सरकारने २५ सप्टेंबर रोजी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे शुल्क माफ करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 30, 2026 | 06:40 PM
HSC-SSC

HSC-SSC

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाचा दिलासादायक मोठा निर्णय
  • दुष्काळग्रस्त महाविद्यालयांचा अहवाल राज्य मंडळाकडे सादर करण्याचे आदेश
  • २६५ तालुक्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ
  • दुष्काळग्रस्त भागातील काही महाविद्यालयांकडून परीक्षा शुल्क घेतल्याने नाराजी
Maharashtra Board Exam 2027: सध्या महाराष्ट्रातील दुष्काळाची झळ अनेक जिल्ह्यांना सोसावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १० व १२ च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने २५ सप्टेंबर रोजी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकानुसार, आगामी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) आणि बारावीच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षांसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही परीक्षाशुल्क घेतले जाणार नाही. दुष्काळग्रस्त भागातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (Examination Forms) विनाशुल्क भरून घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिले आहेत.

दुष्काळग्रस्त महाविद्यालयांचा अहवाल राज्य मंडळाकडे सादर करण्याचे आदेश

तसेच, राज्यातील सर्व विभागीय मंडळांनी आपापल्या भागातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत या सूचना तात्काळ पोहोचवाव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने राज्य मंडळाकडे सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..

दुष्काळग्रस्त भागातील काही महाविद्यालयांकडून परीक्षा शुल्क घेतल्याने नाराजी

राज्यात सर्वत्र दुष्काळ असतानाही काही महाविद्यालयांकडून परीक्षा शुल्कासाठी विद्यार्थ्यांवर तगादा लावला जात असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून राज्य मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील हजारो विद्यार्थी आणि पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. यासंदर्भातील सविस्तर व अधिकृत सूचना लवकरच संबंधित शाळा व महाविद्यालयांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहेत.

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

Web Title: Maharashtra board exam 2027 fee waiver drought affected talukas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • 10th Board Exam
  • 12th
  • Mharashtra

संबंधित बातम्या

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ
1

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?
2

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.