तसेच आवेदनपत्रे भरण्यापूर्वी शाळांनी स्कूल प्रोफाईलमधील शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय व शिक्षकांची अद्ययावत माहिती भरून मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेली दहावीची परीक्षा यंदा 10 दिवस आधीच नियोजित करण्यात आली होती. यामुळे निकालही लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत राज्य मंडळातर्फे देण्यात आले होते.
दहावी-बारावी परीक्षा सुरू झाल्यापासून नागरिक पत्रकार व मान्यवर व्यक्तीकडून काही परीक्षा केंद्रावर कॉपी व अन्य परीक्षेतील गैरप्रकार सुरू असल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला आहे. वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याची पद्धत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.
पहिल्या दिवसापासूनच भरारी पथक सक्रिय राहणार आहे. ग्रामीण भागात, केंद्रप्रमुखांना बोर्डाने कडक सूचना जारी केल्या आहेत. जर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळले तर कठोर कारवाई होणार आहे.
यंदा विभागातून 1 लाख 51 हजार 371 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 1 लाख 54 हजार 724 होती. यावेळी 3,353 विद्यार्थी कमी झाले आहेत.