दहावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभाग अव्वल (फोटो सौजन्य-X)
Maharashtra Board SSC 10th Result 2025 in Marathi: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी परीक्षेची यादी जाहीर केली आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद पार पडली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. या वर्षी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी दहावीसाठी विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 टक्के इतकी आहे. तर 28 हजार 12 खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच ९ हजार ६७३ अपंग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थी परिक्षेला बसले असून त्यापैकी ८ हजार ८४८ उत्तीर्ण झाले. शरद गोसावी म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या ९२.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
नऊ विभागीय मंडळांमध्ये एकूण १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थी बसले होते. १४ लाख ८७ हजार ३९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे. नवीन विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का ९४.१० टक्के आहे. शरद गोसावी म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांचा (विशेष, अपंग, फ्रेश, पुनर्परीक्षार्थी) उत्तीर्णतेचा टक्का ९३.०४ टक्के आहे.
तसेच दहावी परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत लगतच्या तीन संधी उपलब्ध होणार आहेत. जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज १५ मेपासून करता येणार आहेत, असे मंडळाने स्पष्ट केले.