10th result (फोटो सौजन्य: social media)
ज्याची विध्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट बघत होते ते आज जाहीर होणार आहे. १० विचा निकाल आज जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज (13 मे 2025) जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल कुठे आणि कसा पाहू शकता चला बघुयात.
निकाल कुठे आणि कसा पाहू शकता?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे निकाल ऑनलाइन पाहू शकतील. महाराष्ट्राचे बोर्डाचे निकाल खाली दिलेल्या दोन वेबसाईटवर पाहू शकता.
mahresult.nic.in,
sscresult.mahahsscboard.in
कसा तपासायचा
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाल्या आणि १७ मार्च २०२५ पर्यंत चालल्या. या परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या. पहिली पाळी सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुसरी पाळी दुपारी ३ ते संध्याकाळी ६ अशी होती. आता आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे विध्यार्थी आणि पालकांची धडधड वाढली आहे.