Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला व बालविकास विभागाचा १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक

महिला व बालविकास विभागाने १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अंगणवाडी सुविधा, पोषण योजनांची अंमलबजावणी आणि डिजिटल सुधारणा या क्षेत्रांत विभागाने उल्लेखनीय कार्य केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 11, 2025 | 07:55 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मंत्रालय स्तरावर राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्री आदिती तटकरे आणि सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांचा गौरव करण्यात आला.

CBSEने भरतीचा निकाल केला जाहीर; २१२ रिक्त जागांसाठी घेण्यात आली भरती

ही मोहीम नागरिक आणि शासन यांच्यातील विश्वास वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे. राज्यातील १२,५०० कार्यालयांमध्ये या उपक्रमांतर्गत सुधारणा करण्यात आल्या. महिला व बालविकास विभागाने आपले संकेतस्थळ युजर फ्रेंडली बनवले असून त्यावर योजनांची माहिती मराठी व इंग्रजीत उपलब्ध आहे.

राज्यातील हजारो अंगणवाड्यांमध्ये विविध सुविधा पुरवण्यात आल्या. १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांमध्ये पायाभूत सुविधा सुधारल्या गेल्या, तर ९ हजारांहून अधिक ठिकाणी शौचालयांची कामे सुरू आहेत. ३४५ अंगणवाड्यांमध्ये पाळणाघर सुरू करण्याचे काम सुरू आहे. ३३ हजार कर्मचाऱ्यांना पोषण व अन्न मापदंड प्रशिक्षण देण्यात आले. ‘पोषण भी पढाई भी’ कार्यक्रमांतर्गत ३७ हजार अंगणवाड्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. पोषण ट्रॅकर प्रणालीवर १०० टक्के ग्रोथ मॉनिटरिंगची नोंद करण्यात आली.

‘पोषण माह’ आणि ‘पोषण पखवाडा’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र देशात आघाडीवर राहिला आहे. विमा योजनांतर्गत हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात आले. १७ हजारांहून अधिक केंद्रांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, १३ हजार ५९५ अंगणवाड्यांचे सक्षम केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

SBI CBO भरती 2025 : २९६४ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, २९ मेपर्यंत अर्ज करा

राज्यात ५३७ बालकांना दत्तक देण्यात आले असून, बालविवाह रोखण्याच्या मोहिमेत ३३१ बालविवाह थांबवण्यात आले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पावर बी डॅशबोर्डचा वापर करण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून २० लाख महिलांना मदत मिळत आहे. कार्यालयीन कामात ई-ऑफिस, न्यायालयीन प्रकरणांमध्ये तातडीचा निपटारा, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष, आणि कार्यालयाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे महिला व बालविकास विभाग राज्यात अव्वल ठरला आहे.

Web Title: Mahila balvikas vibhag pratham karayalayin sudharna mohim 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • Aditi Tatkare

संबंधित बातम्या

Diwali Bonus:   आनंदाची बातमी ! दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी इतक्या रुपयांची भाऊबीज भेट जाहीर
1

Diwali Bonus: आनंदाची बातमी ! दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी इतक्या रुपयांची भाऊबीज भेट जाहीर

Aditi Tatkare : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा, आदिती तटकरे यांचे निर्देश
2

Aditi Tatkare : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा, आदिती तटकरे यांचे निर्देश

Aditi Tatkare: “GST परिषदेतील ‘हे’ निर्णय…”; काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे?
3

Aditi Tatkare: “GST परिषदेतील ‘हे’ निर्णय…”; काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे?

Raigad News: “दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे…”; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश
4

Raigad News: “दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे…”; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.